मुंबई : कोविड योध्दांच्या वारसांना (Covid Warriours) महानगर पालिकेच्या (BMC) सेवेत सामावून घेण्यासाठी त्यांच्या शिक्षणानुसार नाेकरी देण्याचा (Education base job) विचार महानगर पालिका करत आहे. दोन वैद्यकिय शिक्षण आणि तीन अभियांत्रिकी शिक्षण (Engineering) घेतलेल्या पाल्यांचे पालिकेकडे अर्ज आले आहेत. त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी देण्याचा विचार पुढे आला आहे. ( BMC Offers job on Education base for Corona Warriors nominees)
पालिकेत अनुकंपतत्वार नोकरी देताना कामगार,कारकुन या पदावर दिली जाते.कोविडमुळे मृत्यू झालेल्या 90 कर्मचाऱ्यांच्या वारसांपैकी चार ते पाच वारसांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकिय अभ्यासक्रम पुर्ण केला आहे.त्यामुळे या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सेवेत सामावून घेण्याचा विचार पुढे आला आहे.याबाबत लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कोविडमुळे आता पर्यंत 228 पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.त्यातील 91 कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिकेने नोकरीत सामावून घेतले आहे.असेही सांगण्यात आले.
मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्या बरोबर त्यांच्या कुटूंबांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.आता पर्यंत 91 कर्मचाऱ्यांच्या वारसांना ही मदत देण्यात आली आहे.कोविडमुळे मृत झालेले कर्मचारी हे स्वत:चा जिव धोक्यात घालून काम करत होते.त्यांच्या कुटूंबाना आधार होईल अशा पध्दतीने महानगर पालिका काम करत आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पालिका मदत करणार आहे.असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
6 हजार 766 कर्मचाऱ्यांना बाधा
महानगर पालिकेच्या 6 हजार 766 कर्मचाऱ्यांना आता पर्यंत कोविडची बाधा झाली आहे.यातील 5 हजार 803 कर्मचाऱ्यांनी कोविडवर मात केली आहे.तर,967 कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरु आहे.
केंद्राची 19 प्रस्तावांना मंजूरी
केंद्र सरकारने 19 कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख रुपयांची अार्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.यात,3 कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.महानगर पालिकेने केंद्राकडे आता पर्यंत 200 च्या आसपास अर्ज पाठवले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.