BMC sakal media
मुंबई

मुंबई महापालिकेची वादग्रस्त रस्ते दुरुस्ती अडचणीत? फडणवीसांचे आयुक्तांना पत्र

समीर सुर्वे

मुंबई : महानगरपालिकेच्या (BMC) प्रस्तावित रस्ते दुरुस्तीच्या (road repairing) दर्जावरुन आता राजकीय वाद (political criticizing) अधिकच पेटणार आहे. माजी मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांना पत्र पाठवून रस्ते दुरुस्तीच्या कामाबाबत शंका उपस्थीत केली आहे.तर,अतिरीक्त आयुक्त पी.वेलरासू यांनीही रस्ते विभागाला पत्र पाठवून 26 ते 30 टक्के कमी दाराने आलेल्या निवीदांबाबत स्पष्टीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही रस्ते दुरुस्ती अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

महानगर पालिकेने 1200 कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी निवीदा मागवल्या आहेत.यात कंत्राटदाराने पालिकेच्या अंदाजित खर्चा पेक्षा 26 ते 30 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे.भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थीत करत या निवीदा रद्द करुन फेरनिवीदा काढण्याची मागणी केली.त्यापुर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही आयुक्त चहल यांना पत्र पाठवून कमी किंमतीत होणाऱ्या कामामुळे दर्जाबाबत शंका उपस्थीत केली आहे.

विरोधकांकडून या निवीदा प्रक्रियेवर शंका व्यक्त केली जात असतानाच फडणवीस यांचे पत्र मिळाल्यानंतर अतिरीक्त आयुक्तांनी रस्ते विभागाला पत्र पाठवून याबाबत खुलासा मागवला आहे.तर,स्थायी समितीत झालेल्या चर्चेत भाजप विकासकामात खोडा आणत असून त्यांच्या मर्जीतील कंत्राटदार यात नसतील म्हणून हे प्रकार केले जात असल्याचा प्रतिहल्ला अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चढवला होता.

फडणवीस यांनी 11 सप्टेंबर रोजी पाठवलेले पत्र

न्यू इंडिया कंस्ट्रक्‍शन कंपनी यांनी पत्र पाठवून सध्या रस्ते दुरुस्तीबाबत सुरु असलेल्या निवीदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी 26 ते 30 टक्के कमी दराने निवीदा भरल्या असल्याबाबत माहिती दिली आहे.यामुळे रस्त्याच्या कामांचा दर्जा राखला जाणार नाही.तसेच,या निवीदा प्रक्रियेत कामाच्या अनुभवाची अटही शिथील करण्यात आल्याची आपली माहिती आहे.रस्ते दुरुस्तीचा दर्जा राखण्यासाठी कंत्राटदारांचा काम करण्याच्या अनुभवाबरोबरच इतर अटीही योग्य असणे गरजेचे आहे.यापुर्वी उघड झालेल्या रस्ते दुरुस्तीच्या घोटाळ्यात 200 रस्त्यांचे काही स्तरच (लेअर)करण्यात आल्या नव्हत्या.(रस्ते दुरुस्ती करताना विविध स्तरानुसार करावी लागते.यात,बारीक खडी,मोठी खडी,खडी डांबराचे मिश्रण त्यांनतर पृष्टभाग असे विविध स्तर असतात).

अतिरीक्त आयुक्तांनी विचारलेले प्रश्‍न

-एकढ्या कमी किंमतीत कामे होणार असतील कामांचा दर्जा कसा राखणार.

-रस्ते घोटाळ्याची पार्श्‍वभुमी असल्याने त्यासाठी कोणती खबरदारी घेण्यात आली आहे.

-वरीष्ठ पातळीवरुन 100 टक्के कामांवर लक्ष ठेवणे शक्‍य नाही अशा परीस्थीतीत काय उपाय आहेत.

-कामाचे ऑडीट करण्यासाठी काय उपाय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT