मुंबई : कोविड उपचारांबरोबरच केंद्राची उभारणी तसेच रुग्णांलयांची तयारी यासाठी मुंबई महानगरपालिकेने 610 कोटी रुपये खर्च केले असून त्यातील 250 कोटी हे विलगीकरण केंद्र आणि कोविड उपचार केंद्राच्या उभारण्यासाठी करण्यात आले आहे. या केंद्रातील प्रत्येक खाटेच्या तयारीसाठी महानगरपालिकेने 33 हजार रुपयांपर्यंतचा खर्च केला आहे. आरोग्य विभागाच्या निधी पैकी 14.3 टक्के खर्च गेल्या तीन महिन्यात कोविडसाठी खर्च झाला आहे.
एप्रिल महिन्यांपासून कोविड रुग्णांची संख्या वाढू लागल्यापासून आतापर्यंत महानगरपालिकेने लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी 172 कोविड केंद्र उभारले आहेत. त्यात 23 हजार 945 खाटा आहेत. तर, हायरीस्क आणि लो रिस्क व्यक्तींसाठी 328 विलगीकरण केंद्र उभारण्यात आले असून त्यात 50 हजार 077 खाटा आहे. या दोन्ही ठिकाणी एक्सरे,ऑक्सीजन आणि काही प्रमाणात अतिदक्षता विभागाही उपलब्ध आहेत. या केंद्राच्या उभारण्यासाठी आतापर्यंत सुमारे 250 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या खालोखाल औषध आणि उपकरणांच्या खरेदीसाठी महानगर पालिकेने 140 कोटी रुपये खर्च केला आहे.
या 610 कोटी रुपयांच्या खर्चात रुग्णालय, यंत्र सामुग्री, डॉक्टरांसह कर्मचार्यांचे वेतन, कर्मचार्यांची निवासव्यवस्था, औषधं, जेवण असा कोविडसाठी झालेल्या सर्व खर्चाचा यामध्ये समावेश आहेे.
केंद्र तयार करण्याबरोबरच मरोळ येथे सेव्हन हिल्स रुग्णालय कोविड उपचारासाठी तयार करणे,आवश्यक उपकरणे, साहित्य खरेदी बरोबरच, औषधांच्या खरेदीसाठी हा खर्च झाला आहे. "कोविड उपचारांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही. असे अतिरीक्त आयुक्त रमेश ककानी यांनी सांगितले. आरोग्य विभागासाठी 4 हजार 260 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांना नेहमीच प्राथमिकता असते. त्यामुळे जे प्रकल्प सुरु आहेत त्यांच्यावर परीणाम होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, पालिकेचे उत्पन्न घटले आहे, हेही खरं असल्याचे ककानी यांनी सांगितले.
आता ताण कमी होईल
मुंबईतील रुग्णवाढीचा दर घटला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्याचा अंदाज आहे. आता प्रत्येक विभागात जास्तीत जास्त दोन कोविड केंद्र सुरु करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. तर, प्रभाग स्तरावर विलगीकरण केंद्र तयार करण्यात येत आहे.
जेवणासाठी 75 कोटी
महानगरपालिकेने रुग्ण, संशयीत रुग्ण, हायरीस्क व्यक्ती तसेच कर्मचाऱ्यांच्या जेवणासाठी आता 75 कोटी रुपयांच्या आसपास खर्च केला आहे. तर, विलगीकरण केंद्रात आतापर्यंत 1 लाख 33 हजार 366 नागरीकांना ठेवण्यात आले होते. तर, कोविड उपचार केंद्रात 31 हजार 671 नागरीक होते.
मोठी बातमी - कोरोनामुळे ८१ वर्षीय बिल्डरचा झाला मृत्यू, शफिकने चालवली शैतानी खोपडी आणि आखला एक प्लॅन...
रुग्णालयांच्या तयारीसाठी 80 कोटी
महानगर पालिकेने रुग्णालयात ऑक्सिजन तसेच वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी लागणारे मास्क आणि PPE किट तसेच इतर खर्चासाठी आता 80 कोटी रुपये खर्च केला आहे. केईएम, सायन, नायर तसेच कुपर रुग्णालयासाठी 40 कोटी, क्षयरोग आणि कस्तुरबा रुग्णालयासाठी 10 कोटी त्याचबरोबर वांद्रे भाभा, घाटकोपर येथील राजावाडी, कांदिवली शताब्दीसाठी 30 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
( संकलन - सुमित बागुल )
BMC spends 610 crore for covid treatment isolation centers and covid hospitals
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.