मुंबई

अवैध मटणविक्रीवर आता कारवाईचा बडगा; सोमवारपासून पालिकेची मोहीम....

मिलिंद तांबे

मुंबई : लॉकडाऊन काळात देवनार कत्तलखाना बंद असल्याने मटणाच्या अनेक दुकानांध्येच बोकडांची कत्तल केली जात होती. तसेच मटणाच्या ब्लॅक मार्केटिंगलाही ऊत आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत कारवाई करण्याचे निर्देश पालिकेला दिल्याने सोमवारपासून (ता. 27) पालिका अवैध दुकानांवर कारवाई करणार आहे. परिणामी मटणाची ब्लॅक मार्केटिंग बंद होऊन मुंबईकरांना दर्जेदार मटण चाखण्यास मिळेल अशी आशा आहे.

देवनार कत्तलखान्यात दिवसाला सुमारे सहा हजार बोकड कापले जातात. तर आठवड्याला 57 ते 60 हजार बोकड कापले जातात. लॉकडाऊन दरम्यान कत्तलखाना बंद राहिल्याने मटणाची ब्लॅक मार्केटिंग वाढली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर 3 जुलै रोजी देवनार कत्तलखाना सुरू करण्यात आला. मात्र, गेल्या 20 दिवसात एकाही बोकडाची कत्तल झालेली नाही. 

मुंबईतील अनेक मटण शॉपमध्येच अवैधपणे बोकडांची कत्तल सुरू आहे. त्यातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात नाही. शिवाय जनावरांची आरोग्य तपासणी देखील होत नसल्याने मिळणाऱ्या मटणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मुंबईत 750 परवानाधारक मटण विक्रेते आहेत. त्यातील 360 विक्रेत्यांना पालिकेने दुकानातच बोकडांची कत्तल करण्याची परवानगी दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणल्याने दुकानांमध्ये जनावरांची कत्तल बंद झाली होती. मात्र, लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा अवैधपणे दुकानांमध्येच कत्तल केली जात असून मटणाचे ब्लॅक मार्केटिंगही सुरू आहे. 
लॉकडाऊनचा असाही होतोय गंभीर परिणाम, शरीरातील 'हे' व्हिटॅमिन होतंय कमी​

जनावरांची कत्तल ही कत्तलखान्यातच करावी, असे जुने निर्देश आहेत. त्यामुळे दुकानांमध्ये जनावरांची कत्तल न करता कत्तलखान्यातून कत्तल करून आणणे योग्य आहे. मुंबईकरांना दर्जेदार मटण मिळावे, असा आमचाही प्रयत्न आहे. मात्र त्या तुलनेत पालिकेने आवश्यक सुविधा पुरवणे गरज आहे. देवनार कत्तलखाना केवळ अर्धा वेळ सुरू असून तेवढ्या वेळेत पुरेसे बोकड कापले जात नाही. केवळ कारवाई न करता पालिकेने सेवा-सुविधा पुरवल्यास अवैध कत्तलीला आणि मटणाच्या ब्लॅक मार्केटिंगला आळा बसेल. 
- मोहम्मद अस्लम कुरेशी, अध्यक्ष, ऑल इंडिया शीप अँड गोट ब्रीडर्स अँड डीलर्स असोसिएशन.
---
मुंबईतील अवैध मटण शॉप्सवर सोमवारपासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार दक्षता पथकाकडून ही कारवाई केली जाईल.  त्यासाठी रेड व्हॅनसह सात पथक तयार करण्यात आली आहे.
- मृदुला अंडे, सहाय्यक आयुक्त, मार्केट विभाग, मुंबई महापालिका.

---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT