BMC sakal media
मुंबई

आरक्षीत भूखंडाबाबत महापालिकेने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

- समीर सुर्वे

मुंबई : आरक्षीत भूखंडाची (Reserved Plot) किंमत 50 कोटींपेक्षा अधिक असल्यास असले भूखंड खरेदी न करता महानगरपालिका (BMC) मालकाला हस्तांतरीत विकास अधिकार (TDR) देऊन हे भूखंड ताब्यात घेणार आहे. सध्याच्या कोविडमुळे (Corona) निर्माण झालेल्या आर्थिक परीस्थीतीमुळे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. (BMC took decision of reserved plot in TDR process for land owner-nss91)

पाेयसर येथील उद्यान आणि मनोरंजन मैदानासाठी आरक्षीत असलेले खासगी भूखंड ताब्यात घेण्यासाठी मालकांने पालिकेला खरेदी सुचना पाठवली आहे.भांडूप येथील उद्यानासाठी आरक्षीत असलेला भूखंडही पालिकेला ताब्यात घ्यायचा आहे.मात्र,या प्रत्येक भूखंडाची किंमत 50 कोटीहून अधिक होत आहे.तसेच,यावर असलेल्या रहिवाशांचे पुनर्वसनही महानगर पालिकेला करावा लागणार आहे.

तसेच,त्यांच्या वारसांनाही नोकरी द्यावी लागणार आहे.त्यामुळे हा खर्च जास्त वाढतो.सध्याच्या आर्थिक परीस्थीतीमुळे महानगर पालिकेला आरक्षीत भुखंड ताब्यात घेण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा खर्च शक्य नाही.त्यामुळे महानगर पालिकेने संबंधीत मालकांना भुखंडाच्या मुल्या प्रमाणे टीडीआर देण्याचा निर्णय घेतला आहे.तसा प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.गुरुवारी होणाऱ्या सुधार समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.

हे आरक्षण पालिकेच्या स्वच्छाधिकार कर्तव्यात मोडत आहे.तसेच,जमिनीचे सध्याचे मुल्य हे 50 कोटीहून अधिक आहे.कोविडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परीस्थीतीमुळे ही भारग्रस्त (अतिक्रमण ) जमिन खरेदी करणे योग्य ठरणार नाही.भूसंपादन धोरणातील तरतूदीनुसार जमिन मालक सहमत असल्यास विकास हस्तांतरण हक्काच्या मोबदल्यात आरक्षीत जागा ताब्यात घेण्यात येईल असे प्रशासनाने या प्रस्तावात म्हटले आहे. पोयसर येथील भुखंड क्रमांक 841 हा 17 हजार 463 चौरस मिटरचा भुखंड उद्यान बगिचासाठी आरक्षीत आहेे.पालिकेने हा भुखंड खासगी मालकाकडून खरेदी केल्यास त्यासाठी 125 कोटी 30 लाख रुपयांचा खर्च होईल.तसेच,भुखंडावरील रहिवाशांचे पुनर्वसन आणि महानगर पालिकेत नोकरीही द्यावी लागेल. भांडूप येथील भुखंड क्रमांक 534 हा 3 हजार 377 चौरस मिटरचा भुखंड उद्यानासाठी आरक्षीत आहे.या जमिन मालकालाही महानगर पालिका टीडीआर देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

Warora Assembly Election Result 2024 : वरोरामध्ये गुलाल भाजपचाच! करण देवतळे 65170 मतांनी विजयी

Kalyan Rural Election Result 2024 : कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 396 मतांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT