coastal road Mumbai sakal media
मुंबई

मुंबई : कोस्टल रोड बरोबर कोस्टल वॉकही; मरीन ड्राईव्हचा विक्रम मोडणार

समीर सुर्वे

मुंबई : वरळी ते नरिमन पॉइंटपर्यंतच्या सागरी किनारी मार्गाचे (Mumbai coastal road) बांधकाम ५० टक्के पूर्ण झाले असून नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचा पालिकेचा (BMC) प्रयत्न आहे. या मार्गामुळे वाहतूक सुसाट होणारच आहे, त्याचबरोबर मुंबईतील सर्वांत मोठ्या किनारी पदपथासह पिकनिक स्पॉटही (picnic spot) तयार करण्यात येणार आहे. पालिका १२ हजार कोटी रुपयांचा खर्च करून हा १० कि.मी.चा मार्ग तयार करत आहे. यामुळे वरळी ते नरिमन पॉइंटपर्यंतचे (worli to nariman point) अंतर १० ते १२ मिनिटांत कापता येईल.

त्यासाठी १११ हेक्टर समुद्रात भराव टाकण्यात आला असून त्यातील ३६ टक्के हिस्सा हा नागरी सुविधांसाठी वापरला जाईल. वरळी-हाजीअली ते प्रियदर्शनी पार्क असा पदपथ तयार केला जात असून त्याचबरोबर सायकल ट्रॅक, खुले नाट्यगृह, उद्याने व खेळांची मैदाने, प्रसाधनगृहे इत्यादी बाबीही ‘कोस्टल रोड’सोबत विकसित करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सागरी किनारा रस्ता’ प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली.

मरीन ड्राईव्हचा विक्रम मोडणार

नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गालगतचा मरीन ड्राईव्ह हा ३.५ कि.मी.चा सागरी पदपथ मुंबईतील सर्वांत मोठा सागरी पदपथ आहे; मात्र कोस्टल रोडचा पदपथ हा यापेक्षा दुप्पट लांबीचा ८.५ कि.मी. असेल. तसेच पदपथाची रुंदी तब्बल २० मीटर असेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

देशी झाडांचे सुशोभीकरण

या पदपथालगत व पदपथांतर्गत सुशोभीकरणाच्या अनुषंगाने देशी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच बसण्यासाठी कट्ट्यांचे बांधकामही करण्यात येणार आहे. समुद्राच्या सान्निध्यात वाढू शकतील अशी झाडे लावण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच या रोडलगत फुलपाखरू उद्यान आणि जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त येथे १,८६४ वाहनक्षमता असलेले तीन भूमिगत वाहनतळ उभारण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT