mumbai corona 
मुंबई

मुंबईकरांची उपेक्षा...मुंबई पालिकेच्या 'त्या' स्वप्नावर पाणी फिरलं!  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव मुंबईत सर्वाधिक आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. राज्य सरकार आणि मुंबई पालिका प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यातच आता मुंबई पालिकेचं एक मोठं स्वप्न कोलमडलं आहे.

दक्षिण मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारात वुहान देशासारखं नवीन रुग्णालय उभारण्याचं बीएमसीचं स्वप्न कोलमडलं आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी दहा दिवसात वुहान शहरात एक हजार खाटांची दोन रुग्णालये बांधण्यात आली होती. 

कोविड-19च्या रुग्णांसाठी नवीन आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी नागरी संस्था वेळोवेळी प्रयत्न करत आहेत. नोकरशाहीच्या लाल टेपमुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या आक्षेपांमुळे आधीच 40 दिवसांचा तोटा झाला आहे. त्यानंतर आता 90 दिवसांत तीन मजली प्री- इंजिनिअर इमारत बांधण्याच्या योजनेला धक्का बसला आहे.

या रुग्णालयाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आणि पावसाळा तोंडावर आल्यानं रुग्णालय बांधणं शक्य नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 

कोरोना व्हायरसच्या लढाईत मुंबईच्या केंद्रस्थानी असलेल्या कस्तुरबा रुग्णालयाला 60 बेड्सचं आयसोलेशन सेंटरसह एक नवीन इमारत मिळणार होती. महापालिकेने एप्रिलच्या सुरूवातीलाच या योजनेस मंजुरी दिली होती. 

यासंबंधी 16 एप्रिलला निविदा काढण्यात आल्या. तिथे सहा निविदा येणार होत्या आणि मात्र 26 एप्रिलला याबाबतचा प्रस्ताव कोलमडला. 28 एप्रिलला, 70 कोटी रुपयांमध्ये रुग्णालयाचं बांधकाम करण्याचं कंत्राट निश्चित करण्यात निर्णय घेण्यात आला. रुग्णालय तयार करण्यासाठी कंत्राटदार पालिकेकडून वर्क ऑर्डरच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या या योजनेची फाईल एका टेबलवरुन दुसऱ्या टेबलवर गेली आहे. 

सर्वात कमी निविदा निश्चित केल्यावर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी अंदाजपत्रकांवर पुन्हा विचारणा करण्यास सांगितले. मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी कंपनीच्या निवडीवर नागरी समितीला प्रश्न उपस्थित करत पत्र लिहिलं आहे. 

या प्रकल्पासाठी कंत्राटदार पात्र नसल्याचं शेख यांनी शनिवारी सांगितलं. फक्त आपत्कालीन परिस्थिती असल्यानं आम्ही अनियमिततांना परवानगी देऊ शकत नाही. आम्ही यापूर्वीच शहरात पाच हजार बेड्स तयार केले असून आणखीन बेड्स येत्या काळात बसविण्यात येणार आहेत. कस्तुरबा रुग्णालय विस्तार प्रकल्प हा दीर्घकालीन काळासाठी फक्त सावधगिरीचा उपाय आहे. या करारात अनियमितता होती म्हणून मी त्यांना ती निदर्शनास आणून दिल्याचं, अस्लम शेख यांनी सांगितलं आहे. 

एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यानं सांगितलं की, बीएमसीच्या आरोग्य पायाभूत सुविधा सेलनं (एचआयसी) शेख यांच्या तक्रारीत उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला आणि त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य आढळलं नाही आहे. अधिकारी आणि तज्ज्ञांनी सांगितलं की, बीएमसीने वेळोवेळी कामकाजाचे आदेश जारी केले असते तर हे आपत्कालीन काम असल्याचं समजून जवळजवळ निम्म्यांहून जास्त रुग्णालय आता तयार झाले असते.

महापालिका प्री-इंजीनियर इमारत (PEB) तंत्रज्ञान रुग्णालय बांधण्यासाठी वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयसीयू बेड्ससह खाटांच्या बाजूला, रुग्णालयात क्लिनिकल प्रयोगशाळा आणि अगदी औषधाची दुकानेही असतील, असं वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये राज्य सरकारकडून MJPJAY योजना लागू

राज्य शासनाने शनिवारी आदेश जारी केले की, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY), गरिबांसाठी विमा योजना, कोविड-19 उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या गरीब रूग्णांना संरक्षण देईल. आतापर्यंत सर्वोच्च खाजगी रुग्णालये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत येत नव्हती.

BMC unable to build hospital for corona patients read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT