.मुंबई: मुंबई महानगर पालिका कोविड बाधित मृतदेह स्मशानभूमी अथवा दफन भुमीपर्यंत नेण्यासाठी 39 शववाहीन्या भाड्याने घेणार आहे. या प्रत्येक शववाहीन्यांच्या 2 महिन्यांच्या भाड्यासाठी पालिका साधारण 10 ते 13 लाख रुपये मोजणार आहे.
महापालिकेने 39 शववाहीन्या भाड्याने घेण्यासाठी निवीदा मागवल्या आहेत. यासाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्च अंदाजित केला आहे.प्रत्येक वाहीनी सोबत 4 कामगार पुरविणेही बंधनकारक आहे.
प्रत्येक प्रभागात एक आणि 15 शववाहीन्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहेत. मृतदेह नेण्यासाठी आता पर्यंत नातेवाईकांना रुग्णवाहीका वापराव्या लागत होत्या. मात्र,लवकरच शववाहीन्या उपलब्ध होणार आहेत.
या शववाहीन्यांसोबत महापालिका 70 रुग्णवाहीकाही तीन महिन्यांसाठी भाड्याने घेणार आहे. या प्रत्येक रुग्णवाहीकेसाठी 3 लाखाहून अधिक खर्च होणार आहे. सध्या पालिकेकडे 90 रुग्णवाहीका आहेत. तर 200 बेस्ट बसचे रुपांतरही रुग्णवाहीकेत करण्यात आले आहे.
मृतदेह वाहून नेण्यासाठी आता पर्यंत रुग्णवाहीकांचा वापर केला जात होता. अनेक वेळा मृताच्या नातेवाईकांना हजाााारो रुपयांचाही खर्च करावा लागत होता. त्याच बरोबर काही भागातील स्मशानभूमी मध्ये गर्दी असल्याने रुग्णवाहीकांचाही खोळंबा होत होता.
संपादन: अथर्व महांकाळ
bmc will pay 10 lac for 2 months rent of hearse
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.