Mumbai Hit and Run mihir shah  
मुंबई

Mumbai Hit and Run: दोघांना उडवल्यावर मिहीर प्रेयसीच्या घरी झोपला अन् मग झाला फरार

Mumbai BMW Accident: मिहीरला पळवून लावण्यात कुटुंबाने मदत केल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: अपघात घडल्यानंतर मिहीरने वडील राजेश यांच्या सोबत प्रेयसीला सुमारे ३० ते ४० कॉल केले. गोरेगाव येथील तिच्या घरी गेला. तेथे सुमारे दीड ते दोन तास त्याने झोप काढली. तितक्यात त्याची बहीण तेथे आली . बहिणीने मिहीरला घेऊन तेथून निघून गेली. त्यानंतर मिहीर, त्याची आई, बहीण आणि मित्र या सर्वांनी आपले फोन बंद केले.

शहा यांच्या घराला कुलूप आहे, अशी माहिती वरळी पोलिसांनी दिली. अपघातानंतर मिहीरने कोणकोणशी संपर्क साधला त्याची माहिती तांत्रिक तपासातून पुढे आली आहे. शिवाय मिहीरला पळवून लावण्यात कुटुंबाने मदत केल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

मिहिरने कार का थांबवली नाही?

साडेपाचच्या सुमारास वरळीच्या सी. जे हाऊसजवळ मिहीर चालवत असलेल्या बी एम डब्ल्यू ने प्रदीप व कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. धडकेमुळे दोघे बीएमडब्ल्युच्या बोनेटवर आले. त्याचवेळी मिहीर याने ब्रेक दाबला. या झटक्यामुळे प्रदीप डाव्या बाजूने खाली पडले. मात्र कावेरी यांची साडी चाकात गुरफटली.

त्यामुळे त्या बोनेटवरून सरकून चाक आणि बंपरमध्ये अडकल्या. याची जाणीव कार चालविणाऱ्या मिहीरला आणि पेशाने चालक असलेल्या बिदावत याला होती. मात्र मिहीर याने कार तिथल्या तिथे का थांबवली नाही? प्रदीप कार मागे धावत थांबा थांबा असे ओरडत होते.

मिहीरने कार थांबवली असती तर कावेरी यांचा.जीव नक्की वाचला असता. अपघात घडला तेव्हा मिहीर दारूच्या नशेत होता म्हणून त्याने गाडी थांबवली नाही? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

लूक आऊट नोटीस

मुख्य आरोपी मिहीरची आर्थिक परिस्थिती आणि त्याच्या वडलांचे राजकीय वलय पाहता तो परदेशात पळून जाऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता वरळी पोलिसांनी देशभरातील सर्व विमानतळांना लूक आऊट नोटीस जारी केली. तसेच सहा पथके तयार करत त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र अपघात घडल्याच्या ३६ तासांनंतरही मिहीर पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

राजेश शहा यांना जामीन, चालकाला एकाच दिवसाची कोठडी !

- अपघात प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना उपनेते राजेश शहा यांची सोमवारी शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. तर सहआरोपी बिदावत याची फक्त एकाच दिवसाची पोलीस कोठडी वरळी पोलीस मिळवू शकले. पोलिसांनी शहा यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक केली होती. मात्र समोर आलेल्या घटनाक्रमानुसार शहा यांच्या गुन्ह्यासाठी ते कलम लागू पडत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. शहा यांना पोलीस कोठडीत धाडण्याची आवश्यकता नाही, असे नमूद करत न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यांची जामीनावर मुक्तताही केली. 

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT