मुंबई

पनवेलच्या पळस्पे-उरण मार्गालगत प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : पनवेल तालुक्‍यातील हरिग्राम ते पनवेल मार्गावरील गाढी नदीच्या पात्रालगत रेग्झिनच्या बॅगमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच, आज सकाळी पनवेलमधील कुंडेवहाळ गावच्या हद्दीत पळस्पे-उरण मार्गालगत एका प्लास्टिकच्या गोणीत आठ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत मुलाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जेएनपीटी रोडच्या बाजूला कुंडेवहाळ गावच्या हद्दीत एक प्लास्टिकची गोण बेवारस पडल्याचे कुंडेवहाळ गावचे पोलिस पाटील दत्तात्रय पाटील यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, त्यात एका मुलाचा मृतदेह असल्याचे कळताच त्यांनी याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह ताब्यात घेऊन पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

या घटनेतील मृत मुलगा हा सात ते आठ वर्षांचा असून त्याच्या अंगात हिरव्या रंगाचे टी-शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ पॅंट आहे. या वर्णनाच्या मुलाबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

प्राथमिक तपासात सदर मुलाची हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेतील मृत मुलाची ओळख पटविण्यासाठी त्याचे छायाचित्र आणि वर्णन सर्वत्र पाठवण्यात आले असून एखाद्या लहान मुलाच्या हरविण्याची तक्रार दाखल आहे का, याचीही माहिती आजूबाजूच्या पोलिस ठाण्यातून मागवण्यात येत आहे. 

- अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक. 

web title : The bodie in a plastic bag along Panvel's Palspay-Uran route

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

Imtiaz Jaleel : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतांच्या फुटीचा जलील यांना फटका

Devendra Fadnavis : फडणवीस यांचा विजयी ‘षटकार’

SCROLL FOR NEXT