body of 11 year old boy found in nandivali lake water mumbai sakal
मुंबई

Mumbai News : डोंबिवलीतील 11 वर्षीय मुलाचा मृतदेह तलावात आढळला

खेकडे पकडण्यासाठी गेला असता मृत्यु झाल्याची प्राथमिक शक्यता

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली येथील एका 11 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नांदिवली येथील तलावात मंगळवारी एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. त्याची ओळख पटल्यानंतर तो डोंबिवलीतील एकतानगर मधील बेपत्ता कार्तिक पवार हा मुलगा असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली.

कार्तिकच्या आई वडिलांनी त्याची ओळख पटविली आहे. खेकडे पकडण्याची कार्तिकला आवड असल्याने तो या तलावाच्या काठी जात असे खेकडे पकडण्यासाठी तो गेला असवा आणि पाण्यात तोल जाऊन त्याचा मृत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून अधिक तपास पोलिस करत असल्याची माहिती प्रभारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश मदने यांनी दिली.

डोंबिवलीतील एकता नगर परिसरात कार्तिक कुटुंबासह रहातो. शनिवारपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात केली होती. शनिवारी आई वडिल कामाला गेले असता कार्तिक घरातून बाहेर पडला होता.

आई वडिल कामावरुन घरी आल्यानंतर कार्तिक घरात नव्हता. रात्रीच्या वेळेस कार्तिक घरी न आल्याने त्याच्या पालकांनी परिसरात, मित्र मंडळींकडे त्याचाी चौकशी केली. मात्र तो कुठेच नव्हता. तो घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती.

टिळकनगर पोलिस तसेच त्याचे पालक दोन दिवस त्याचा शोध घेत होते. मंगळवारी दुपारी आरटीओ वाहन तपासणी केंद्राजवळील तलावात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती.

मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश मदने यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला होता. मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार कोणत्या पोलिस ठाण्यात दाखल आहे का ?

याचा तपास पोलिसांनी घेतला असता टिळकनगर पोलिस ठाण्यात अशी तक्रार दाखल असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कार्तिकच्या आई वडिलांना माहिती दिली. आई वडिलांनी मृतदेह पाहिला असता तो कार्तिकच असल्याची ओळख दिली.

कार्तिकला खेकडे पकडण्याची आवड होती. पाऊस सुरु झाला की वेळ मिळेल तसा कार्तिक त्या तलावावर जात असे. शनिवारी देखील तो पालकांना कोणतीही माहिती न देता दुपारच्या वेळेत खेकडे पकडण्याचे सामान घेऊन घरातून बाहेर पडला असावा. मलंग रस्त्यावरील नांदिवली येथील तलावाकडे तो गेला असता तेथे त्याचा तोल जाऊन तो तलावातील पाण्यात बुडून मृत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून अधिक तपास केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT