sushant singh rajput 
मुंबई

सुशांतला दिले जाणारे ड्रग्स पुरवणारा सापडला? NCBची कारवाई

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात आणखी दोघांना अटक

सुरज सावंत

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सिद्धार्थ पिठानीनंतर आणखी दोघांना अटक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात NCB चे अटकसत्र अद्यापही सुरूच आहे. या प्रकरणी ड्रग्ज (Drugs) अँगल येताच वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात गोव्यातून (Goa) हेमल शहा (Hemal Shah) या ड्रग्ज तस्कराला अटक केली होती. तर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीलाही (Siddharth Pithani) अटक करण्यात आली होती. त्यानंतर याच मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आणखी दोघांना अटक केली आहे. (Bollywood Actor Sushant Singh Rajput Death Case 2 more arrested in Drugs Angle Case)

NCBने नुकतेच दोन ड्रग्ज पेडलरना ताब्यात घेतलं आहे. हरीश खान (Hairsh Khan) आणि साकीब खान (Sakib Khan) अशी या दोघांची नावं आहेत. सुशांतच्या मृत्युनंतर अनेक दिवस विविध प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात होते. या प्रकरणात डॅग्सचा अँगल आल्यानंतर तपासाला वेग आला होता. पण हे दोघे खान बंधू मात्र फरार आरोपी होते. NCB ने या दोघांना शोधून अटक केली. महत्त्वाची बाब म्हणजे सुशांतला दिल्या जाणाऱ्या ड्रग्जचा पुरवठा हा हरीश खान याच्याकडूनच होत असल्याचा संशय NCBला आहे. त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

Siddharth-Pithani

NCB ने सुशांत प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग तस्करांना अटक केली. हेमल शाहच्या अटकेनंतर सुशांत सिंहच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणात अनेक नवीन खुलासे होतील असा अंदाज वर्तवला जात होता. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स संबधित चित्रपट क्षेत्रातील अनेक व्यक्तिंची नावे समोर आली होती. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कठोर कारवाई करत अनेक काही ड्रग्ज पेडलर्सना अटक केली. ड्रग्स आणि बॉलिवूड यांच्यातील संबंध शोधत NCB ने अनेक नामांकित सेलिब्रिटींचीही चौकशी केली. गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. ड्रग्स ओव्हरडोज हे मृत्यूचे कारण असल्याचे काहींकडून सांगण्यात आले होते. तेव्हापासून NCB कडून बॉलिवूड आणि ड्रग्ज रॅकेटमधील संबंध शोधण्यास सुरूवात झाली होती.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT