मुंबई : आयएनएस विक्रांत निधी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला असून, न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे थोड्या का होईना पण किरीट सोमय्या यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारपासून (दि.18) सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत. (Bombay HC Granted Interim Protection To Kirit Somaiya)
आयएनएस विक्रांतसाठी (INS Vikrant) गोळा केलेल्या मदतनिधीत सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला असून, याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमय्या यांनी ‘विक्रांत’ युद्धनौका जतन करण्यासाठी २०१३ मध्ये नागरिकांकडून निधी गोळा केला होता. त्याची सुमारे ५७ कोटी रुपयांची रक्कम अद्याप सरकारकडे जमा झालेली नाही. त्याबाबत माजी लष्करी जवानाने फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांना समन्स बजावले होते. मात्र, सोमय्या चौकशीला गैरहजर राहिले. दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, संबंधित रकमेबाबत समाधानकारक माहिती सोमय्या यांच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आली नाही, असे निरीक्षण नोंदवून न्या. आर. एन. रोकडे यांनी त्यांचा जमीन अर्ज नामंजूर केला. होता. त्यानंतर किरीट सोमय्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने वरील निकाल दिला आहे.
आणखी एक दिलासा घोटाळा!!!!
दरम्यान, आयएनएस विक्रांतसाठी (INS Vikrant) गोळा केलेल्या मदतनिधीत सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला असून, याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्या यांना काहिसा दिलासा देत अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर या प्रकणात आरोप करणारे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत आणखी एक दिलासा घोटाळा!!!! असे खोचक ट्वीट केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.