मुंबई

यंदा हिंदमाता तुंबणार नाही? पावसाळ्यापूर्वी पालिका करणार 'हे' काम

पूजा विचारे

मुंबई: मुंबईतील हिंदमाता परिसर... पावसाळ्यात या परिसरात पाणी तुंबलं नाही असं कधी होत नाही. थोड्या पावसानेही दादर मधील हिंदमाता परिसरात पूरसदृश्य परिस्थिती तयार होत असते. त्यामुळे या परिस्थिती पासून म्हणजेच पुरापासून हिंदमाताकरांची सुटका करण्यासाठी पालिका आता भूमिगत टाक्या उभारणार आहे.

थोड्या पावसानं तुंबणाऱ्या पाण्यामुळे या परिसरातील लोक पावसाळ्यात त्रस्त असतात. स्थानिकच नाहीत तर रस्त्यावरील वाहनांना देखील अडचणी येत असतात. येथील भाग खोलगट असल्यामुळे काही केल्या पावसाळ्यात भरलेल्या पाण्याचा निचरा लवकर होत नाही. यामुळे समाज माध्यमांवर या प्रकारावरून पालिकेला मोठ्या टिकेचा सामना करावा लागतो.

दरवर्षी अतिवृष्टीत पाणी तुंबल्यामुळे होणार्‍या गैरसोयीतून हिंदमाताकरांची सुटका करण्यासाठी पालिका जवळच्याच सेंट झेवियर्स फुटबॉल मैदान आणि प्रमोद महाजन मैदानात दोन मोठे भूमिगत टँक आणि इथे असलेल्या पुलाखाली खाली तीन छोटे टँक बांधणार आहे. हिंदमाता पाणी भरल्यानंतर हे पाणी समुद्रात भरती असताना पाणी समुद्रात सोडता येत नाही, अशा वेळी हे पाणी या टाक्यांमध्ये सोडलं जाईल. मग भरती ओसरल्यानंतर हे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून नजिकच्या नाल्यांमधून नदी-समुद्रात सोडण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी पालिका १३० ते १४० कोटींचा खर्च करणार आहे. तर पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. ही संकल्पना याआधी टोकियोत राबवण्यात आली होती. त्याच धर्तीवर मुंबईत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर मुंबईत इतर पाणी तुंबणार्‍या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Bombay Municipal Corporation build underground tanks at Hindmata work before rains

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT