Chitra Wagh 
मुंबई

बोरीवली प्रकरण: तेंव्हा तुम्ही गप्प का? चित्रा वाघ महापौरांवर कडाडल्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईमध्ये भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. या प्रकरणावरुन काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजपा नगरसेविकांनी मारहाण केली असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. यासंदर्भात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी बोरिवलीत ही घटना घडली होती. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी म्हटलंय की, या प्रकरणात आम्ही कुणालाही पाठीशी घालत नाहीये. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जरुर चौकशी करा. कसून चौकशी करा. यात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल तर त्याच्यावर कारवाई जरुर करा. मात्र, इतर घटना असतात त्यावेळी का बरं शांत बसतात. वर्षभर का गुन्हा दाखल झाला नाही, याचीही चौकशी करा. आम्ही पीडितेच्याच बाजूने आहोत. या प्रकरणाशी संबंधित काही लोकांचे व्हिडिओ आमच्याकडे आले आहेत, ते आम्ही पोलिसांना देणार आहोत. ज्या भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात ही घटना घडली, त्या नगरसेविकेने पोलिसांना यासंदर्भात माहिती देणारं पत्र दिलं आहे, असं त्यांनी म्हटंलय.

पुढे चित्रा वाघ यांनी महापौर पेडणेकर यांनी थोबाड फोडण्याच्या वक्तव्यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. विनोद घोसाळकर यांनी महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. तो संदर्भ देऊन त्यांनी म्हटलं की, तेव्हा तुम्हाला त्यांचं थोबाड फोडावं वाटलं नाही का? पुढे त्या म्हणाल्या की, तुमच्याच पक्षाच्या माजी महापौरांनी भर रस्त्यात एका महिलेचा हात पिरगळला होता, तेव्हा तुम्हाला त्याचं थोबाड फोडावं वाटलं नाही का? दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं थोबाड फोडण्याची भाषा करताना आपल्या पक्षातील अशा लोकांकडे कानाडोळा करणं तुम्हाला शोभत नाही, असं चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकर यांना म्हटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटंलय की, आज डोंबिविलीत घडलेल्या घटनेपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची विनयभंगाची घटना जास्त मोठी वाटतीय. त्याचीही चौकशी पोलिसांनी कसून करावी आणि आरोपीला शिक्षा करावी. डोंबिवली १४ वर्षीय मुलीवर ३० जणांचा सामुहीक बलात्कार घटनेसंदर्भात संध्याकाळी ४ वाजता मानपाडा पोलिस स्टेशन डोंबिवली येथे पोहोचतं आहे, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT