no kissing zone 
मुंबई

बोरिवलीकरांवर का आली 'No Kissing Zone' सूचना लिहिण्याची वेळ?

सकाळ वृत्तसेवा

रस्त्यावर फिरताना आपण अनेक प्रकारच्या पाट्या पाहिल्या असतील. नो हॉर्न, नो पार्किंग किंवा सायलेंट झोन अशा अनेक प्रकारच्या पाट्या किंवा सूचना आपण पाहिल्या असतील. पण, मुंबईच्या बोरिवलीतील (Mumbai Borivali) एका सूचनेने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे

मुंबई- रस्त्यावर फिरताना आपण अनेक प्रकारच्या पाट्या पाहिल्या असतील. नो हॉर्न, नो पार्किंग किंवा सायलेंट झोन अशा अनेक प्रकारच्या पाट्या किंवा सूचना आपण पाहिल्या असतील. पण, मुंबईच्या बोरिवलीतील (Mumbai Borivali) एका सूचनेने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या पाट्या पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या पाट्यावरील मजकुरही तसा भन्नाट आहे, या पाटीवर लिहिलंय 'नो किसिंग झोन' (No Kissing Zone). अशी पाटी वाचून आश्चर्य वाटलं नसेल तरच नवल. (Borivali garden No Kissing Zone sighs for love couple)

बोरिवलीच्या जॉगर्स पार्कवर लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. पण, याठिकाणी लिहिलेला मजकूर वाचून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. 'नो किसिंग झोन' असं याठिकाणी लिहिण्यात आलंय. असं लिहिण्यामागचं कारण म्हणजे स्थानिक रहिवाशी येथील प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे पाहून पुरते कंटाळले आहेत. जॉगर्स पार्कमध्ये अनेक कपल्स येतात. त्यांच्याकडून अनेकदा अश्लील चाळे होत असल्याचं दिसून आलंय. अशामुळे येथील सोसायटीवाले त्रासले आहेत. त्यामुळे त्यांनी रस्त्यावरच नो किसिंग झोन म्हणून लिहिलं आहे.

जॉगर्स पार्क हा बोरिवलीतील हाय प्रोफाईल भागामध्ये येतो. याठिकाणच्या गार्डनला अनेक कपल्स भेट देतात. अडोसा पाहून कुठेतरी बसतात किंवा कोपऱ्यात उभे राहतात. अनेकदा ते अश्लील चाळे करतात. त्यामुळे आजबाजुच्या परिसरात राहणाऱ्या सोसायटीमधील महिला, लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती यांना हे पाहून अवघडल्यासारखं होतं. यावर उपाय म्हणून रहिवाशांनी ह्या ठिकाणाला नो किसिंग झोन करुन टाकलं आहे.

रहिवाशी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी झटत होते. यावेळी त्यांना एक नामी शक्कल लढवली. त्यांनी याठिकाणीच्या रस्त्यावर नो किसिंग झोन असं लिहून टाकलं. याचा चांगला परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. हा मेसेज पाहून अनेक कपल्सनी अश्लील चाळे करणं सोडून दिलं आहे. शिवाय कपल्सचे या ठिकाणी येणेही आता कमी झालं आहे. त्यामुळे एकप्रकारे अश्लीस चाळे करणाऱ्या कपल्संना रहिवाशांनी वेसण घातले असं म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT