kamathipura esakal
मुंबई

Kamathipura : 'रेडलाईटच्या अंधारातून प्रकाशाकडे..' जन्म झाला कामाठीपुऱ्यात मात्र संघर्षाने बनले डॉक्टर इंजिनियर Ground Report

Achievements through struggle: बनले डॉक्टर इंजिनियर

Chinmay Jagtap

मुंबईसह संपूर्ण जगात कुप्रसिद्ध असलेल्या कामाठीपुरा मधील वेश्या व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांविषयी समाजामध्ये नकारात्मकताचं पसरली आहे. मात्र त्यांची दुसरी बाजू? ते आपल्या मुलाबाळांसाठी करत असलेली मेहनत आणि या मेहनतीला मिळालेला गणपती बाप्पाचा आशीर्वाद याविषयी कित्येकांना काहीच माहिती नाही. याच महिलांशी आम्ही स्वतःहून जाऊन संवाद साधला.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या वेश्यांची पूढची पिढी नक्की काय करते? त्यांच्या पिढीलाही बाप्पाचा आशीर्वाद लाभतो का? ते लोक आज मोठ्या पदावर आहेत का ? ते सर्वेजण आज स्वतःचा ठसा उमटवत आहेत का ? अश्या कित्येक प्रश्नाची उत्तर शोधायला आम्ही पोहोचलो थेट त्यांच्याच वस्तीत.

कामाठीपुरामुळे जन्मलेले आणि कामाठीपुरासाठीच काम करत असलेले कामाठीपुरा मधील सुप्रसिद्ध समाजसेवक गणेश महाराज यांच्याशी संपर्क साधला. यावेळी अशी समजले कि, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज अशी कित्येक उदाहरण कामाठीपुरामध्ये आहेत. मात्र जगाला त्याची माहितीच नाही

कामाठीपुरामध्ये ज्या महिला आपला उदरनिर्वाह करतात याचे कारण असतं त्यांच्यावर उद्भवलेली वाईट परिस्थिती. कोणी स्वतःहून स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी काम करत नाही यामुळेच या सर्वांची इच्छा असते की आपला मुलगा असो की मुलगी येत्या काळात मोठे व्हावेत, त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि कुठेतरी मोठ्या पदावर नोकरी करावी.

यामुळेच की काय तर आज कामाठीपुरामध्ये जन्माला आलेली कित्येक मुलं ही परदेशात आहेत. भारतात विविध ठिकाणी काम करत आहेत. मुंबईमध्ये चांगलं काम करत आहेत.अशावेळी कशाप्रकारे या महिलांनी स्वतःच्या पुढच्या पिढीला या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी शिकवलं. कशाप्रकारे त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला सक्षम बनवलं. ही त्या महिलांच्या संघर्षाची बातमी आहे.

कामाठीपुरामध्ये एक अलेक्झेंड्रीया नावाची बदनाम इमारत आहे. या ठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका महिलेने मुलीला जन्म दिला. आज अशा ठिकाणी जन्माला आलेली मुलगी ही अमेरिकेमध्ये इंजिनियर आहे.

या मुलीच्या आणि तिच्या आईची संघर्षाची कहाणी सुरू होते ती तिच्या जन्मापासूनच. आपण या वेश्या व्यवसायात आहोत. मात्र आपली मुलगी या व्यवसायात नको. अशी ह्या आईची इच्छा होती. यासाठी त्या मुलीला तिने मोठे होताच कामाठीपुरा मधनं बाहेर काढलं आणि स्वतःही तिच्यासोबत बाहेर राहायला गेली.

कामाठीपुरामध्ये उदरनिर्वाह करायचा मात्र आपल्या मुलीला इथली सावलीही लागायला नको यासाठी तिच्या आईने ती कृती केली. मुलीला शाळेत घातलं. तिला हवं ते केलं. तिच्या गरजा भागवण्यासाठी आपला उदरनिर्वाह सुरूच ठेवला. कामाठीपुरा मध्ये मात्र त्या मुलीला या ठिकाणी येऊ दिलं नाही.

पुढे मुलगी मोठी झाली. विविध संस्थांकडुन तीला मदत मिळाली. मुलगी हुशार आणि मेहनती होती. पण तिला बाप्पाचा आशीर्वाद ही मिळाला. आज ती अमेरिकेमध्ये गेली. तिथे इंजिनियर झाली. इंजिनियर झाल्यावर आपल्या आईला देखील या जंजाळातून बाहेर काढलं. समाज तिच्याकडे 'वेश्येची मुलगी' म्हणूनच बघेल. यासाठीच तिचं नाव आम्ही गुलदस्त्यात ठेवत आहोत.

अशीच गोष्ट मुंबई मधल्या एका हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध कॅन्सर स्पेशालिस्टसोबत काम करणाऱ्या एका मुलीची. त्या मुलीचा ही जन्म हा कामाठीपुरामध्ये झाला आणि आज ती त्या डॉक्टरचा उजवा हात म्हणून काम करत आहे.

कामाठीपुरामध्ये जन्माला आलेला एक मुलगा आज अमेरिकेमध्ये इंजिनियर आहे. तर दुसरीकडे साऊथ आफ्रिका आणि लंडन या ठिकाणी देखील कामाठीपुरामध्ये जन्माला आलेली दोन मुलं आज मोठ्या पदांवर आहेत. आज ही जी मुलं आपापल्या पदावर आहेत ती त्यांच्या आईने केलेल्या संघर्षामुळे आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळे.

या सर्व मातांनी इतकच केलंय की परपुरुषाच्या शारीरिक गरजा पुरवता पुरवता आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या आहेत. आणि त्यांना आज मोठ्या ठिकाणी 'साहेब' बनवले आहे.

तसं म्हणायला गेलो तर या मुलांचा ही संघर्ष काही कमी नाही. आईची हालखीची परिस्थिती असताना आणि बाप कोण नक्की हे माहीत नसताना ज्या प्रकारचे जीवन ही मुलं जगून आज मोठ्या पदावर पोहोचली आहेत या सर्व मुलांना केवळ सलामच केला पाहीजे.

भारतात राहूनही सक्षम

भारतीय समाज भावनेनुसार परदेशात जाणं हेच जरी खऱ्या अर्थाने यशस्वी होण्याचं प्रमाण जरी असलं तरीदेखील आज मुंबईमध्ये कामाठीपुरामध्ये जन्मलेली अशी कित्येक मुलं आहेत, जे जन्माला कामाठीपुरामध्ये आले मात्र आज त्यांनी पांढरपेशा समाजामध्ये स्वतःचं लहानसं विश्व तयार केलं असून या समाजाच्या खांद्याला खांदा लावून ते उभे आहेत.

उदाहरण द्यायच झालं तर मुंबई ही मायानगरी म्हणून ओळखली जाते आणि ह्या मायानगरीमध्येच म्हणजेच फिल्मसिटीमध्ये काम करणारी कित्येक मुल अशी आहेत ज्यांचा जन्म हा कामाठीपुरामध्ये झाला होता. मुंबईमध्ये स्वतःच ब्युटी पार्लर असलेल्या कित्येक मुली या कामाठीपुरामध्ये जन्माला आलेल्या आहेत. टेलर म्हणून ब्युटीशियन म्हणून डॉक्टर कडे काम करणाऱ्या नर्सेस किंवा वॉर्ड बाय आज मुंबईमध्ये विविध ठिकाणी काम करत आहेत.

समाजाने नाकारलेल्या वाईट नजरेने बघितलेल्या घृणा वाटेल अशा वस्तीत राहिलेली मुलं देखील जर आज स्वतःच्या पायावर उभी आहेत. स्वतःच्या आईच्या हिम्मतीने आणि बाप्पाच्या आशीर्वादाचे आज ती मुलं उभे आहेत. तर त्यांच्यासमोर आपण (सर्वसामान्य नागरिकांच) दुःख काहीच नाही. आपल्या सर्वांना आजूबाजूला जे चांगलं समाज जीवन मिळतं हे पाहून तरी नक्कीच सर्वसामान्यांना प्रेरणा मिळेल हेच अपेक्षा.

हि सर्व माहिती कामाठीपुरामुळे जन्मलेले आणि कामाठीपुरासाठीच काम करत असलेले कामाठीपुरा मधील सुप्रसिद्ध समाजसेवक गणेश महाराज यांनी दैनिक सकाळ शी बोलताना दिली

शब्दांकन चिन्मय जगताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री? पुण्यात निकालाआधीच लागले शुभेच्छांचे बॅनर

Fact Check : सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची बिटकॉइन घोटाळ्याची 'ती' ऑडिओ क्लिप खोटी

Latest Maharashtra News Updates : गौतम अदानींना आणखी एक मोठा झटका, केनिया सरकारने 5 हजार कोटींचा करार रद्द केला

SCROLL FOR NEXT