Sakal News 
मुंबई

Vasai Attack: वसईत प्रियकराकडून प्रेयसीवर लोखंडी पान्यानं केले वार; भररस्त्यात घडला थरार; व्हिडिओ व्हायरल

काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या कॅमेरॅत कैद केला पण हा प्रकार थांबवायला कोणीही पुढे आलं नाही.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : प्रेमात टोकाची पावलं उचलली गेल्याची अनेक उदाहरण आपण पाहिली असतील अशीच एक थरारक घटना वसईत नुकतीच घडली. या घटनेत प्रियकरानं सकाळच्या वेळेत भर रस्त्यात प्रेयसीवर लोखंडी पान्यानं वार करत तिची हत्या केली. यावेळी त्याला अडवण्याचा प्रयत्न एका तरुणानं केला पण तोवर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर निपचित पडली, त्यातच तिचा मृत्यू झाला. (boyfriend attacked his girlfriend with an iron spanner at vasai the video went viral aau85)

रोहित यादव असं प्रेयसीची हत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. वसई पूर्वच्या चिंचवडा परिसरात सकाळी साडे आठ नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. तरुण जेव्हा तरुणीवर हल्ला करत होता तेव्हा सुरुवातीला त्याला अडवण्याचा प्रयत्न कोणी केला नाही.

पण नंतर एका तरुणानं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यानं त्यालाही जुमानलं नाही आणि तो रस्त्यावर निपचित पडलेल्या तरुणीवर हल्ला करत राहिला. काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या कॅमेरॅत कैद केला पण हा प्रकार थांबवायला कोणीही पुढे आलं नाही. दरम्यान, आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, ही घडलेली घटना अत्यंत हिंसक आहे, ती भररस्त्यात घडते हे चिंताजनक आहे. या सगळ्यात बघ्यांची भूमिका घेत नागरिक कोणीही मदतीला धावून आलं नाही त्यामुळं ही घटना चिंताजनक आहे. यामधील आरोपीवर कठोर कलमं लावण्यात यावीत यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील राहिल अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरु झाला होता. आरोपीनं मुलीवर पान्यात एकूण १४ ते १६ वार केले आहेत, या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला.

वसईत एका मुलीची झालेली हत्या ही काळजाचा थरकाप करणारी आहे. हत्येच्यावेळी एकही माणूस तिच्या मदतीला जायचा प्रयत्न करत नाही. महाराष्ट्राच्या राजधानीजवळ अशी घटना घडणं हे महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT