Breaking News sakal
मुंबई

Breaking News: वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला बेड्या, ३५ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने पकडले!

सकाळ वृ्त्तसेवा

Mumbai Crime News : शहरातील टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक बागुल यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) सोमवारी रंगेहाथ अटक केली. एसीबी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बागुल यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोड करून ३५ हजार रुपये स्वीकारण्यास ते तयार झाले.

या प्रकरणातील तक्रारदाराने ठराविक मुदतीत पैसे दुप्पट करण्यासाठी ओळखीतल्या एका महिलेच्या पतसंस्थेत २७.५० लाख रुपये जमा केले होते. मात्र ही योजना फसली आणि महिला १० लाख रुपयेच परत करू शकली.

उर्वरित १७.५० लाख रुपये परत मिळवण्यासाठी तक्रारदाराने तगादा लावताच महिलेने त्याच्या विरोधात उलटी तक्रार केली. चौकशी करण्यासाठी तक्रारदारास पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. तेव्हा उर्वरित रक्कम मिळवून देतो, त्याबदल्यात एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी बागुल यांनी केली.

बागुल यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे याबाबत तक्रार दिली. एसीबीने तक्रारीची खातरजमा केली आणि सापळा रचला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT