Death  Sakal Media
मुंबई

भिवंडी : इमारत कोसळून महिलेचा मृत्यू; दोघे जण गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : शहरातील शांतीनगर परिसरात घराच्या सज्जाचा स्लॅब (house slab collapsed) शेजारील घरावर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू (Woman Death) झाला; तर दोघे जण गंभीर जखमी (two people injured) झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात (Shantinagar police station) नोंद करण्यात आली आहे. शांतीनगर भागातील आझाद नगरमध्ये (Azad Nagar) गौसिया मशिदीजवळ इसरार सिद्दीक यांचे घर आहे. त्यांच्या घरात भाडोत्री असलेल्या अन्सारी यांच्या घरावर आज सकाळी सहाच्या सुमारास सज्जाचा स्लॅब पडला.

घरात गाढ झोपलेल्या पाच व्यक्ती स्लॅबखाली अडकल्या होत्या. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेची माहिती प्रभाग अधिकारी फैसल तातली, दिलीप खाने यांना मिळताच त्यांनी कर्मचारी पथक आणि वैद्यकीय पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाचे जवान व पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग कर्मचाऱ्यांचा मदतीने स्लॅबखाली अडकलेल्या शादाब अन्सारी, इशान अन्सारी यांना बाहेर काढले; तर या दुर्घटनेत गुलशन सगिर अन्सारी (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाला. सगिर खलिल अन्सारी (वय ४५), मेहताब अन्सारी (वय ३०) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने सायन इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT