bullock cart race in dombivali sakal media
मुंबई

डोंबिवली: पडले गावात उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा; कोरोना नियमांची पायमल्ली

शीळ डायघर पोलिसांचे दुर्लक्ष, शर्यतीत कोरोना नियम पायदळी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना (bullock cart race in dombivali) परवानगी दिल्यानंतर बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) या शर्यतींवर बंदी आणली आहे. कोरोना काळात शर्यतींवर बंदी असतानाही प्रजासत्ताक दिनी पडले देसाई गावातील माळरानावर बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला. ही शर्यत पहाण्यासाठी माळरानावर हजारोंच्या संख्येने बैलगाडा प्रेमी जमले होते. ऐवढी मोठी जत्रा गावात भरली असतानाही पोलिसांचे त्याकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या शर्यतीचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन (corona rules breaks) केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल करीत कारवाईची दिखावा केला आहे.

कोरोना नियमांचे पालन करीत सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. कोरोना नियमांची पाबंदी असली तरी शर्यतींवर बंदी उठल्याने बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर राज्यात कोरोनाची तिसरी लाट त्याचबरोबर ओमिक्रॉन या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध पुन्हा कडक केले असून बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली आहे. तसेच गावांत आयोजित केल्या जाणाऱ्या जत्रा, उत्सवांना देखील बंदी घालण्यात आली आहे. असे असताना शासनाचे नियम धाब्यावर बसवित पडले देसाई गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन त्याचबरोबर घोडे आणि बैल खरेदी विक्री बाजार गावच्या माळरानावर भरविण्यात आला होता.

प्रजासत्ताक दिनी सकाळी 7 वाजल्यापासून बाजारास आणि शर्यतीस सुरुवात झाली होती. ती सायंकाळी 5 वाजेपर्यंत बैलगाड्यांची बारी सुरुच होती. 5 लाखांपर्यंत बैलांच्या बोल्या लागल्या जात होत्या. याचे अनेक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत होते, मात्र शीळ डायघर पोलिसांना त्याची कुणकुण देखील न लागावी यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

आंदोलन, मोर्चे या ठिकाणी त्वरीत पोहोचणारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिसांनाही याची माहिती मिळाली नाही का असा सवाल जागरुक नागरिक उपस्थित करत आहेत. जत्रेचे, शर्यतीचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाले, तसेच प्रसिद्धी माध्यमांपर्यंत ते पोहोचल्याने शीळ डायघर पोलिसांनी घाईमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाईचा दिखावा केला आहे. याविषयी शीळ डायघर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT