मुंबई : निवडणुका झाल्या झाल्या आमच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरला, आम्हाला फक्त एक दिवसाचा अवधी दिला, आम्ही एका दिवसात जायचे कुठे, आमच्या घरातील भांडीकुंडी, कपडे, विद्यार्ध्याचे शैक्षणिक साहित्य, जमीनदोस्त झाले, होत्याचे नव्हते झाले. ही कैफियत मांडली आहे. पवई येथील भीमनगर तेथील उध्दवस्त झालेल्या नागरिकांनी. लोकांनी आता हिरानंदाने गार्डन समोरील फुटपाथवर तात्परता आसरा घेतला आहे. आम्हाला पर्यायी घरे द्या किवा रहात होतो त्या ठिकाणी पुन्हा पाठवा, नुकसान भरपाई द्या, अशी मागणी स्थानिकांनी केल्या आहेत.
गेल्या ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागला. त्यानंतर पाच जून रोजी पालिकेच्या भांडूप येथील विभाग कार्यालयाने नोटीस काढली. झोपड्यांची जागा खाली करण्य सहा बाबत नोटीस पाठविली. सहा जून रोजी सकाळी झोपड्यांवर बुलडोझर चालविला. आम्हाला काही कळण्याच्या आज त्यांनी आमचा झोपड्या पाडल्या. फक्त एक दिवसाची मुदत आम्हाला दिली होती. आम्हा चार आठ दिवस दिले असते तर आम्हा पर्याय शोधला असता. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर आम्हा आता जायचे कुठे, मुलाचे शाळेचे साहित्याचे नुकसान झाले आहे. झोपड्यांचे पुरावे नष्ट झाले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून या भागात आम्ही येते रहात, सगळी पुरावा आमचा जवळ आहेत. आता होत्याचे नव्हते झाले. आम्ही आता जायचे कुठे, पाऊस कधीही सुरू होईल, आम्ही आता रहायचे कुठे, ही कैफियत मांडली आहे. सुनीता सांगळे या स्थानिक रहिवाशी महिलेने.
आम्ही पोलिसांवर दगडफेक केली नाही. दगडफेक केली ती बिल्डने आणलेल्या लोकांनी. त्यांच्यामुळे आमच्यावर पोलीसांनी लाठीमार केला. त्यामुळे आमचा महिला जखमी झाल्या. मुलांना आणि महिलांना पोलिसांनी अमानुश मारहाण केली. त्यात ५० रहिवाशी जखमी झाल्याचे नंदा गायकवाड महिलेने सांगितले. आजही पोलीस ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, दिसेल त्या मुलांना घेवून पोलीस ठाण्यात नेत आहेत. त्रास देत आहे. हा त्रास थांबला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
होते त्याच ठिकाणी पूनर्वसन हवे
आमचे पूनर्वसन होतो त्याच ठिकाणी झाले पाहिजे. सर्व रहिवाशांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, रहिवाशांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी या रहिवाशांच्या वतीने अॅड, माधवी गायकवाड यांनी केली आहे.
न्यायालयात जाणार
येथील रहिवाशांकडे पुरावे आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून ते येथे रहात आहेत. या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय स्थानिक रहिवाशांनी घेतला आहे.
- पालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांना निवेदन दिले, मात्र निवेदनाची दखल घेतली नाही.
- झोपड्या पाडल्यानतर त्या भुखंडावर पोलिस संरक्षण ठेवण्यात आहे आहे. या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
- ४ एकर जागेत सुमारे ६५० झोपड्या होत्या. त्या जमीनदोस्त केल्या आहे.
- सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी, मात्र झोपडीधारकांच्या पूनर्वसनाबाबत अद्याप निर्णय नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.