Maharashtra Cabinet Members Pay Tribute to Ratan Tata During the Meeting esakal
मुंबई

Ratan Tata: रतन टाटांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत संमत!

Sandip Kapde

ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत रतन टाटा यांच्यावर शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली. याबरोबरच, रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता ही समाज उभारणीचा प्रभावी मार्ग आहे. नवनवीन उद्योगांच्या उभारणीमुळेच देश प्रगतीपथावर नेता येतो. रतन टाटा यांच्यासारख्या विचारवंत आणि समाजसेवकांनी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती प्रामाणिक कळवळा बाळगला. त्यांनी उद्योगक्षेत्रातच नव्हे तर समाजाच्या उभारणीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले.

नैतिक मूल्ये आणि परोपकार-

रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनेक वर्षे सांभाळली. टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून त्यांनी उत्कृष्ट परोपकारी काम केले. त्यांच्या नैतिक मूल्यांची जपणूक इतर उद्योजकांसाठी व उद्योगातील भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. स्वातंत्र्यानंतर देशाची पुनर्निर्मिती करण्यामध्ये टाटा समूहाचा सिंहाचा वाटा होता.

रतन टाटा यांचे नाव मोटारीपासून मिठापर्यंत, आणि कंप्युटरपासून कॉफी-चहापर्यंत अनेक उत्पादनांशी जोडले जाते. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा आणि कोविड काळात पीएम रिलीफ फंडाला दिला गेलेला 1500 कोटी रुपयांचा मदतीचा हात अद्वितीय होता. यावेळी त्यांनी रुग्णांसाठी आपल्या हॉटेलचा वापर देखील केला, ज्यामुळे त्यांचा समाजातील मोठेपणा सिध्द झाला.

रतन टाटा नेहमीच तरुणांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यात आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात त्यांनी तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी इनोव्हेशन सेंटर सुरू केले. त्यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला 'उद्योग रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला, जो त्यांच्या कार्याची दखल घेतला गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata: राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; रतन टाटांसाठी केली 'ही' महत्वाची मागणी

Latest Maharashtra News Updates : रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले

PAK vs ENG 1st Test: पाकिस्तानच्या ६ गोलंदाजांची 'Century'! इंग्लंडसमोर लाचारी,ही तर झिम्बाब्वेपेक्षा बेक्कार कामगिरी

Ratan Tata: स्वातंत्र्यलढ्यात रतन टाटांनी इंग्रजांना हैराण केलं होतं; ब्रिटिश गाड्यांच्या इंजिनात साखर टाकायचे अन्...

Ratan Tata: रतन टाटांच्या मदतीने अवघ्या 21व्या वर्षी उभारली 500 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT