मुंबई

कर्करोगावरील औषधे स्वस्त; 42 औषधांच्या किमती 90 टक्‍क्‍यांनी कमी

मिलिंद तांबे


मुंबई : कर्करोगाची अनेक महागडी औषधे स्वस्त झाली आहेत. नॅशनल ड्रग्स ऍथोरिटीने आपल्या अहवालात ही माहिती दिली. कर्करुग्णांना अनेक महागडी औषधे 90 टक्के कमी दराने मिळणार आहेत. स्तन आणि फुप्फुसाच्या कर्करुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

नॅशनल ड्रग्स ऍथोरिटीने (एनपीपीए) याबाबतची अधिसूचना काढत अंमलबजावणीचे निर्देश दिले होते. औषध उत्पादकांकडून या अधिसूचनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे 526 ब्रॅंडच्या 42 कर्करोगविरोधातील औषधांच्या किमती 90 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आल्या आहेत. बिर्लोटीब ब्रॅंडच्या अंतर्गत उत्पादित एर्लोटिनिब हे 150 एमजीच्या औषधाची किंमत 9999 हजार रुपयांनी घसरून 891.79 रुपये झाली आहे. या औषधाच्या किमतीत 91.08 टक्के घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे 500 एमजीचे पेमेट्रॅक्‍सिड इंजेक्‍शनची किंमत 25,400 रुपयांवरून 2509 रुपयांपर्यंत खाली आली आहे. या औषधाची किंमत 90 टक्के कमी झाली आहे. 

कर्करोगावर साधारणतः 20 हजार रुपये किंमत असणारी 124 औषधे उपलब्ध असून, त्यातील 62 औषधांच्या किमतीमध्ये बदल झाले आहेत. या पायलट योजनेच्या अंमलबजावणीमुळे कर्करोग रुग्णांचे 984 कोटी रुपये वाचवणे शक्‍य झाले आहे. ऑल इंडिया ड्रग एक्‍शन नेटवर्कनेही एमपीपीएने कर्करोगाविरोधी औषधांचा नफा सार्वजनिक हितासाठी मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. 

मुंबईत रोज दोन बळी 
मुंबईत फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूंपैकी फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरात दिवसाला सरासरी दोन जणांचा मृत्यू फुप्फुसाच्या कर्करोगाने होतो. मुंबईत 2014 मध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाने 831 जणांचा मृत्यू झाला, तर 2015 मध्ये 682 जणांचा मृत्यू झाला. 2015 मध्ये कर्करोगाने मृत्यू होणाऱ्यांपैकी 12.8 टक्के जणांचा फुप्फुसाच्या कर्करोगाने बळी घेतला होता. 2014 मध्ये हे प्रमाण 13.9 टक्के होते. 2018 मध्ये संपूर्ण देशात 45 हजार 363 जणांचा मृत्यू झाला होता. 

कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, त्यासाठीचे उपचार महागडे आहेत. प्लास्टोझुमॅब, टार्गेट थेरपी सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. अनेक रुग्णांना आजही हे उपचार परवडत नाहीत. सरकारने ही औषधे आणि थेरपी स्वस्त केल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. 
- डॉ. दीपक निकम,
कर्करोग तज्ज्ञ, बॉम्बे रुग्णालय कर्करोग विभाग 

औषधांच्या विक्रीत नफा मोठा होता. त्याचा फायदा उत्पादकांना होत होता. हा नफा कमी झाला असून, याचा फायदा रुग्णांना होणार आहे. 
- अभय पांडे,
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया फूड अँड ड्रग लायसेंस होल्डर फाऊंडेशन 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT