मुंबई: राज्यात सुरु असलेल्या राजकीय सभा, (political rally) आंदोलनांवर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) संताप व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (navi mumbai airport) कोणाचे नाव द्यावे? या मुद्यावरुन झालेल्या आंदोलनावर (protest) उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. "आम्ही हे असं चालवून घेणार नाही. आम्ही कोर्ट बंद केलेत. आम्ही पूर्ण क्षमतेने काम करत नाही आहोत. पण राजकीय सभा, आंदोलन सुरु आहेत" असं मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता म्हणाले. (Can't it wait till Covid is over? Mumbai high court slam govt over navi mumbai airport protest)
"तुम्ही कोविडचं व्यवस्थापन कसं करणार?, ही सभा, आंदोलन करण्याची वेळ आहे का? विमानतळाला नाव देण्याच्या मुद्यावरुन शेवटचं आंदोलन झालं होतं. कोविड संपेपर्यंत थांबता येत नव्हतं का? विमानतळ सुरु झालाय का? 25 हजारांच्या आसपास लोकं तिथं गोळा झाली होती, कशासाठी?" असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला आहे.
नवी मुंबई आंदोलनावरून हायकोर्टाने खडे बोल सुनावले आहेत. कोरोनाची साथ सुरु असताना होणाऱ्या या राजकीय आंदोलनांवरुन उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारले. कोविड नियम मोडून होणारी कुठलीही राजकीय सभा रोखण्यासाठी तुम्ही तुमची यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे, असे मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.