मुंबई

कार चालकांनो इकडे लक्ष द्या! मुंबई पालिकेनं दिली 'ही' अत्यंत महत्त्वाची सूचना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या दिशेनं वादळाचा वेग वाढला आहे. या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं वाहनांमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत. या काळात कार-जीप इत्यादी वाहनाने प्रवास करत असताना खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत काच फोडता येईल असं एखादं साधन ठेवण्याची सूचना मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. 

चक्रीवादळामुळे मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे-विमानांच्या वेळापत्रकात बदल

पाण्यात गाडी अडकल्यास आणि ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादे साधन असणे अत्यंत गरजेचं असतं. म्हणून संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कार- जीप इत्यादी वाहनाने प्रवास करताना खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत काच फोडता येईल असे साधन ठेवण्याची सूचना  महापालिकेनं केली आहे.

26 जुलै 2005 चा दुर्देवी पूर्वानुभव लक्षात घेता कार किंवा जीपची 'विंडो' काच फोडता येईल असे साधन गाडीमध्ये सहज हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवणे उपयुक्त ठरेल. 26 जुलै 2005 ला झालेल्या अतिवृष्टीत काही चार चाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिममध्ये पाणी गेल्यामुळे सदर यंत्रणा बंद पडली होती.  परिणामी गाडीचे दरवाजे आणि खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचे कारमध्येच दुर्दैवी मृत्यू झाले होते. गेल्या वर्षी 2019 च्या पावसात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. ज्यात दोन व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. ही बाब लक्षात घेऊन आणि अशा घटना टाळता याव्या, यासाठी काही अत्यंत महत्वाच्या कारणासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडायचं झाल्यास आणि चारचाकी वाहनाने प्रवास करावयाचा असेल तर खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रवास करण्यापूर्वी गाडीमध्ये काच फोडता येईल, असे हातोडा, स्टेपनी पान्हा यासारखे एखादे साधन ठेवायला विसरू नये. तसंच हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता गाडी चालकाला सहजपणे हाताला लागेल अशाप्रकारे ठेवावे, असेही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं नागरिकांना आवर्जून सांगितलं आहे. 

मुंबई ठाण्यात पावसाला जोर 

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यासह कल्याण आणि बदलापूरमध्ये जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मुंबईत ही पाऊस सुरु आहे. ठाण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. नवी मुंबईसह पनवेल परिसरातही पाऊस पडतोय. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT