कोरोना युद्धात मृत्यू आल्यास, ''शहीद'' घोषित करावे! 
मुंबई

कोरोना युद्धात मृत्यू आल्यास, ''शहीद'' घोषित करावे!

सकाळ वृत्तसेवा

रायगड : कोरोनाच्या जैविक युद्धात जनतेसाठी सहकार्य आणि मदतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या शासकीय अधिकारी, पोलिस, डॉक्टर, नर्स, पत्रकार आणि सफाई कामगार यांच्यासह अन्य शासकीय आस्थापनेतील कर्मचारी यांना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू आल्यास त्यांना शहीद म्हणून घोषित करावे, अशा आशयाचे निवेदन उरण शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर यांनी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना दिले आहे.

निवेदनाची प्रत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही पाठविण्यात आली आहे. सध्या आपण सर्व कोरोनाविरोधात लढत आहोत. जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणारे, सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे शासकीय अधिकारी, पोलिस, डॉक्टर, नर्स, पत्रकार आणि सफाई कामगार सर्वच आस्थापनांचे अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढत आहेत. 

त्यामुळे त्यांचावर जीव गमावण्याची परिस्थिती ओढावू शकते. त्यांचे कुटुंबीय उघड्यावर येऊ शकते. त्यामुळे या शूरवीरांना शासकीय मदतीसह शासनाने शहीद म्हणून घोषित करावे, अशा मागणीचे निवेदन प्रकाश ठाकूर यांनी उरणच्या तहसीलदारांना दिले. निवेदनावर उरणच्या माजी नगरसेविका आफशा मुखरी व माजी नगरसेवक बबन कांबळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

SCROLL FOR NEXT