मुंबई : कोरोना संकटामुळे सध्या शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन वर्ग (Online Classes) सुरु आहेत. शाळा-कॉलेजला जाणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थी घरातूनच ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहतात. हे असे ऑनलाइन वर्ग सुरु असताना, काही अनोळखी आरोपींनी अश्लील प्रकार केल्याची घटना घडली आहे. हा हॅकिंगचा (Hacking) प्रकार असण्याची शक्यता असून आरोपींनी तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन वर्गात घुसखोरी करून विले पार्ले येथील एका नामांकित महाविद्यालयाच्या ऑनलाईन वर्गात अश्लील चित्रफीत चालवली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (case filed against playing obscene video in a college online classroom in vile parle)
ऑनलाइन वर्ग सुरु असताना एका अनोळखी सायबर हॅकरने यंत्रणा हॅक करून प्रवेश केला व पॉर्न व्हिडीओ लावला. याप्रकरणी कॉलेजच्या प्राध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन जूहू पोलिसांनी अनोळखी हॅकर्सविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. जुहू पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संबंधित हॅकर्सचा शोध घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सायबर बुलिंगसाठी काहीजण ऑनलाईन अश्लील कृत्य करणे, अश्लील संभाषण करणे, शिक्षकांना शिवीगाळ करणे असे प्रकार करीत आहे. केवळ मौजमजेसाठी असे प्रकार घडत असल्याचे काही प्रकरणातून उघडकीस आले आहे.
अलीकडेच साकिनाका येथे खाजगी क्लास सुरु असताना सायबर बुलिंगसाठी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी राजस्थानच्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शाळा, कॉलेज आणि खाजगी क्लासेस बंद आहेत. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन शिक्षणावर अधिक भर दिला आहे. या घटनेची कॉलेजच्या व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली आहे.
(case filed against playing obscene video in a college online classroom in vile parle)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.