Prakash Ambedkar nana patole 
मुंबई

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांच्या खरमरीत टीकेनंतर नाना पटोलेंची सावध भूमिका; नव्याने लिहिलं पत्र

Cautious reaction of nana Patole after Prakash Ambedkar harsh criticism: महाविकास आघाडीची मुंबईतील बैठक पार पडली आहे. बैठकीनंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- महाविकास आघाडीची मुंबईतील बैठक पार पडली आहे. बैठकीनंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. बैठकीमध्ये जागवाटपाबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. आघाडी मजबूत आहे, आमच्यात एकजूट आहे. तिन्ही पक्ष एकत्र आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

४८ जागांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. काहीही चिंता करण्याची गरज नाही. काही लोक देव पाण्यात ठेवून बसले असतील. आम्ही ३० तारखेला पुन्हा बैठक घेणार आहोत. आम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अधिकृतरीत्या निमंत्रण पाठवलं आहे. ३० तारखेला ते देखील बैठकीला उपस्थित राहतील, असं राऊत म्हणाले. (Cautious reaction of nana Patole after Prakash Ambedkar harsh criticism)

आमजी जी भूमिका आहे, तीच भूमिका प्रकाश आंबेडकरांची आहे. आमच्यात मतभेद नाहीत. राजू शेट्टी यांच्यासोबत सुद्धा व्यवस्थित चर्चा सुरु झाली आहे. ३० तारखेपर्यंत सर्व निर्णय होतील. प्रत्येत जागा ही महाविकास आघाडीची आहे. आम्ही ४८ जागा जिंकणार हा आमचा निर्धार आहे. नितीश कुमार सोडून जाणार नाहीत. इंडिया आघाडीचे ते एक स्तंभ आहेत. आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकरांची काही मतं होती. आमची भूमिका वरिष्ठांनी त्यांच्यासमोर मांडली. संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे नेते ३० जानेवारीला बैठकीसाठी येतील. जे काही वाटत होतं ते त्यांनी मांडलं होतं. पण, आता गैरसमज दूर झालेला आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. दरम्यान, ३० जानेवारीला महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर आपले प्रतिनिधी पाठवण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला समावून घेण्याबाबतचं निमंत्रणाचं पत्र प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आलंय. पण, आंबेडकरांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी मनाचा खेळ करत आहात, तुमच्या मेंदूत कदाचित लोचा झाला आहे, असं त्यांनी म्हटलं. आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या पत्रावरील नाना पटोलेंच्या स्वाक्षरीला आक्षेप घेतला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Chh. Sambhajinagar : चेकपोस्टवर पाच कोटींची रक्कम जप्त....परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात पोलिसांची दक्षता

'डॉ. आंबेडकरांचं संविधान धोक्यात आलंय, दलित समाजाला आता त्यांचं भावनिक भाषण नकोय'; समरजित घाटगेंचा हल्ला

SCROLL FOR NEXT