मुंबई

बेलापूरचं पार्किंग आणि 'ते' धंदे..

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : टक्केवारीच्या समीकरणामुळे बदनाम असलेल्या स्थायी समितीमधील कामकाजाचा फटका आता थेट सर्वसामान्य नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. घसघशीत टक्केवारी देणाऱ्या मर्जीतील कंत्राटदारालाच सीबीडीतील वाहनतळाचा ठेका मिळावा, या अट्टाहासावर सत्ताधारी अडून बसले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा आलेला वाहनतळाचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी नामंजूर केला. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा फेरनिविदा काढाव्या लागणार आहेत. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे सीबीडी-बेलापूरच्या जनतेला वाहनतळाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत वाहनतळाची जागा अपुरी असल्यामुळे रोजच्या संध्याकाळी वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पालिका प्रशासनातर्फे सीबीडी-बेलापूर सेक्‍टर 15 येथील भूखंड क्रमांक 39 वर सुमारे 30 कोटी रुपये खर्च करून बहुमजली वाहनतळ उभारले जाणार आहे.

या वाहनतळामुळे तब्बल 800 वाहनांचा प्रश्‍न सुटणार असल्याने बेलापूर व सीबीडीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. प्रशासकीय मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आला, तेव्हा प्रशासनाने निविदा प्रक्रियेच्या शर्यतीत अजवानी, महावीर आणि जे. एम. म्हात्रे हे कंत्राटदार तांत्रिक समितीने अपात्र ठरवल्यामुळे मे. यु.सी.सी. इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. यांना देण्याचे प्रस्तावित केले होते; परंतु, हा मर्जीतील कंत्राटदार नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी गेल्या आठवड्यातील स्थायी समितीमधील हा प्रस्ताव स्थगित केला.

त्यानंतर एक आठवड्याने शुक्रवारी (ता.27) स्थायी समितीच्या पटलावर हा प्रस्ताव आला असता पुन्हा नामंजूर केला. या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधाऱ्यांनी तांत्रिक समितीच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत अपात्र कंत्राटदारांना कमी पडलेले कागदपत्र सादर करून पुन्हा संधी देण्याची मागणी केली आहे. 

पालिकेतर्फे तयार करण्यात येत असलेला बहुमजली वाहनतळ उभारणीचे काम कोणत्याही कंत्राटदाराला मिळो, त्याच्याशी काही संबंध नाही. फक्त निविदा प्रक्रियेत तांत्रिक समितीने कोणावर अन्याय करू नये, तसेच पालिकेच्या पैशांची बचत व्हावी हाच प्रस्ताव नामंजूर करण्यामागील हेतू आहे. 
- नवीन गवते, सभापती, स्थायी समिती 

सत्ताधारी दिवाळखोराच्या प्रेमात 

पालिकेची विविध विकासकामे करणारा एक कंत्राटदार वित्त टंचाईमुळे आर्थिक दिवाळखोर घोषित झाला आहे. या कंत्राटदाराने नवी मुंबईतील बड्या नेत्यांना काही टक्केवारी मंजूर केल्यामुळे स्थायी समितीमधील सत्ताधाऱ्यांच्या शिलेदारांना प्रशासनाच्या कंत्राटदाराला विरोध करावा लागत आहे. परंतु, या कंत्राटदाराच्या व्यक्तींनीही स्थायी समितीच्या सुभेदाराला कागद दर्शन केल्यामुळे, आलेले कागद परत कसे पाठवायचे, अशी चर्चा महापालिकेत रंगली आहे.  

WebTitle : CBD belapur parking lots controversy see full case study


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT