Manoj Jaranage Patil Maratha Reservation News 
मुंबई

जे बोललं ते करुन दाखवलं! वाशीत मराठा आंदोलकांचा जल्लोष; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे उपोषण सोडणार

Manoj Jaranage Patil Maratha Reservation News: मराठा समूदायाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- मराठा समूदायाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे वाशीत जमा झालेल्या तमाम मराठा बांधवांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. आज आमची दिवाळी आहे अशी भावना मराठा बांधव व्यक्त करत आहेत. माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे सभास्थळी येणार आहेत. यावेळी जरांगे पाटील उपोषण सोडतील.

वाशीच्या शिवाजी चौकात मराठा आंदोलकांचा जल्लोष पाहण्यासारखा आहे. अनेक जणांनी डिजेच्या तालावर ठेका धरला आहे. मोठ्याने घोषणा देण्यात येत आहेत. पोवाड्यांचे गायन सुरु आहे. केवळ वाशीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा बांधवांनी जल्लोषाची तयारी सुरु केली आहे. जवळपास सहा महिन्यांच्या आंदोलनाला आज यश आलं आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील हे शेवटपर्यंत आपल्या मागणीवर ठाम राहिले आणि त्या मान्य होईपर्यंत ते मागे फिरले नाहीत. त्यामुळे मराठा बांधवांचे ते हिरो ठरले आहेत. शुक्रवारी अकरा वाजल्यापासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. आज अखेर ते उपोषण सोडणार आहेत. माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन ते आज नऊ वाजताच्या सुमारास आपले उपोषण सोडतील. यावेळी जरांगे पाटील मराठा समूदायाला संबोधित करतील.

रात्रीपर्यंतची दिली होती मुदत

मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सरकारला एका रात्रीची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी आझाद मैदानात येण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सरकार सक्रीय झालं होतं. काल रात्रभर जरांगे यांच्या मागण्यांसंबंधात अध्यादेश काढण्यात आला. त्यानंतर पहाटे ३ वाजता अध्यादेश जरांगे पाटील यांना सुपूर्द करण्यात आला होता. त्यानंतर ते उपोषण मागे घेणार असल्याचं स्पष्ट झालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump 2.0: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आले! राष्ट्राध्यक्ष पदाच्या दुसऱ्या टर्मचा भारतावर काय होऊ शकेल परिणाम?

लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहत होती हृता दुर्गुळे ; आई होती नाराज पण सासूबाईंची होती अशी प्रतिक्रिया

'सासूसाठी भांडण अन् सासूच आली वाट्याला..'; 'मविआ'चा लाटकरांना पाठिंबा, विरोध करणाऱ्यांवरच आली प्रचार करण्याची वेळ

Mukesh Ambani Diet: नीता अंबानींनी शेअर केला मुकेश अंबानींचा डाएट प्लॅन, निरोगी राहण्यासाठी तुम्हीही करू शकता फॉलो

Stock Market: ट्रम्प यांचा दणदणीत विजय आणि भारतीय शेअर बाजाराने दिली सलामी; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT