मुंबई

मुंबईतील मराठी चित्रपटांच्या हक्काचे 'सेंट्र्ल प्लाझा' होणार इतिहासजमा; आर्थिक संकटामुळे बंद करण्याचा निर्णय

संतोष भिंगार्डे

 
मुंबई : चेंबूर येथील सहकार आणि ताडदेव येथील गंगा-जमुना ही सिंगल स्क्रीन थिएटर काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी हवेत विरते न् विरते तोच आता मुंबईतील आणखी एक सिंगल स्क्रीन काळाच्या पडद्याआड जाणार आहे. मराठी चित्रपटांसाठी हक्काचे थिएटर असणारे गिरगाव येथील सेंट्र्ल प्लाझा बंद करण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे. त्यामुळे हे थिएटरही आता इतिहासजमा होणार आहे.

एकेकाळी कित्येक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी चित्रपटांनी या सिंगल स्क्रीनमध्ये रौप्य व सुवर्ण महोत्सव साजरे केले आहेत. परंतु, टीव्हीबरोबरच मल्टिप्लेक्सची वाढणारी संख्या आणि आता ओटीटी प्लॅटफाॅर्मचे वाढते प्रस्थ यामुळे सिंगल स्क्रीनचा व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यातच सरकारचे विविध कर आणि आता कोरोनामुळे कित्येक सिंगल स्क्रीन्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दादा कोंडकेंचे एकटा जीव सदाशिवपासून सगळे चित्रपट गिरगाव येथील सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाले आणि त्यांनी घवघवीत यश मिळविले. व्ही. शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटाने येथे सिल्व्हर ज्युबिली यश मिळविले. वजीर आणि आहुती या मराठी चित्रपटांचे प्रीमियर या थिएटमध्ये झाले. मराठीबरोबरच हिंमतवाला, हमजोली, फकिरा, अनहोनी, प्यार का मौसम, अशा काही चित्रपटांनीदेखील येथे रौप्यमहोत्सव  साजरा केला. 

खर्च न परवडणारा!
सेंट्र्ल प्लाझा थिएटरचे एक भागीदार दिलीप वर्तक यांनी याबाबत सांगतले की, कोरोनामुळे आता थिएटर्स कधी उघडतील हे सांगता येत नाही. सरकारचे विविध कर, विजेचे बिल असा एकूणच खर्च आम्हाला परवडणारा नाही. त्यामुळे काही कालावधीसाठी आम्ही हे थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

सिंगल स्क्रीनचा टिकाव कठिण
कोरोना संकटामुळे मुंबई तसेच महाराष्ट्रातील जवळपास तीस ते चाळीस सिंगल स्क्रीन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एकूणच वाढता खर्च पाहता पुढे सिंगल स्क्रीनचा व्यवसाय टिकेल की नाही, अशी शंका व्यवसायिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे सरकारने आता तरी काही नियमावलीनुसार लवकरात लवकर चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच, आता चित्रपटगृहे उघडली तरी कित्येक सिंगल स्क्रीन आपला गाशा गुंडाळतील, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: छत्रपती शिवाजी महाराजांची अन् रामदासांची भेट कुठे झाली? स्थळ, ठिकाण, वेळ कोणती?; अमित शहांना कुणी दिलं ओपन चॅलेंज

Indrajeet Sawant : “अमित शहांच्या विधानामागं व्यूहरचना"; शिवराय-रामदास स्वामींबाबतकेलेल्या विधानावर इंद्रजीत सावंतांची टीका

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत निवडणूक निरीक्षक कटारा यांचे राजकीय प्रतिनिधींना मार्गदर्शन

Dombivali Assembly Election : विधानसभा निवडणूका लागताच डोंबिवलीतील रस्ते डांबराने केले गुळगुळीत

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत स्टार प्रचारकांसाठी राजकीय पक्षांची धडपड; बाॅलिवूड, टाॅलीवूडशी संपर्क

SCROLL FOR NEXT