मुंबई: मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरातील भंगार विकून 225 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे आणि इतर धातूच्या भंगाराची विक्री केली आहे. यासह निरुपयोगी रूळ, रुळांचे साहित्य, मोडीत काढलेले डबे, वाघिणी, इंजिने, जुने डबे, माल डबे, चाके यांची विक्री करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेमध्ये ‘शून्य भंगार मोहिम' सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागाने, मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभागातील, वर्कशॉप, शेड येथील परिसरातील भंगार विकले आहे. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत मध्य रेल्वेने 224.94 कोटी रुपयांचे भंगार विकले आहे. शून्य भंगार मोहिमेमुळे भारतीय रेल्वेला अधिकचा महसूल मिळतो. यासह या मोहिमेमुळे भंगारामुळे व्यापलेली रिकामी होते. अतिरिक्त जागेची व्यवस्था होते. 2019-2020 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने निरुपयोगी रूळ, रुळांचे साहित्य भंगारमध्ये विकून 321.46 कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मध्य रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागाने कोरोना काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लॉकडाऊनमुळे देशभरात जीवनावश्यक, अत्यावश्यक सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी मालगाडी आणि पार्सल गाडी याची जास्त प्रमाणात आवश्यकता भासली. यासाठी सामग्री व्यवस्थापन विभागाने देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालगाड्या आणि पार्सल गाड्यांच्या इंजिनांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे सुटे भाग आणि इतर लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा केला. पीपीई किट्स, एन- 95 मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स या वस्तू कर्मचार्यांना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यासाठी अल्प कालावधीत निविदा काढून खरेदी करण्यात या विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Central Railway Administration earned 225 crore by selling scrap metal railway
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.