central railway sakal media
मुंबई

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रोलिंग स्टॉकचा घेतला आढावा

ईमयू डबा, कोचिंग, वॅगनची महाव्यवस्थापकांंनी केली पाहणी

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेचे (central railway) महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी (gm anil kumar lahoti) यांनी मुंबई विभागातील (Mumbai region) प्रत्येक ठिकाणी पाहणी दौरे सुरू केले आहेत. नुकताच त्यांनी सीएसएमटी ते ठाणे (csmt to thane) पाहणी (inspection) दौरा केला. मध्य रेल्वेच्या ऑपरेशन्स विभागाचा आढावा घेतला. तर, आता मध्य रेल्वेच्या रोलिंग स्टॉकचा आढावा घेतला. यामध्ये ईमयू डबा, कोचिंग, वॅगनची पाहणी केली.

लाहोटी यांनी मध्य रेल्वेेचे प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता आणि इतर रोलिंग स्टॉक अधिकाऱ्यांसह रोलिंग स्टॉक विभागाचा आणि कामगिरीचा आढावा घेतला. लाहोटी यांनी कोचिंग, ईएमयू, वॅगन मेंटेनन्स आणि वर्कशॉप अ‍ॅक्टिव्हिटीज या विषयांवर चर्चा केली. तर, प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता ए. के. गुप्ता आणि रोलिंग स्टॉक विभागाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोलिंग स्टॉकच्या देखभालीसाठी भविष्यातील योजना सादर केल्या.

महाव्यवस्थापकांनी कोचिंग, ईएमयू आणि वर्कशॉप टीमने केलेल्या विविध नवकल्पनांचे कौतुक केले. तसेच सर्व प्रवासी इलेक्ट्रिक लोको हेड ऑन जनरेशन वैशिष्ट्याने सुसज्ज असतील, याची खात्री करण्यास सांगितले. पार्सल व्हॅन म्हणून वापरल्या जाणाऱ्या डब्यांची वाहून नेण्याची क्षमता, ऑटोमोबाईल वाहक कोचमध्ये सुधारणा आणि पाणी वाचवण्यासाठी कोच वॉशिंग डेपोमध्ये सांडपाणी प्रक्रिया युनिट्सची तरतूद यावर त्यांनी मार्गदर्शन केले. या व्यतिरिक्त, पर्यावरणाशी संबंधित योगदान आणि मध्य रेल्वेचे यश देखील महाव्यवस्थापकांना दाखविण्यात आले, अशी माहिती मध्य रेल्वेच्यावतीने देण्यात आली.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT