chandrakant kulkarni natya festival Sakal Group over police vivek phansalkar Sakal
मुंबई

मराठी नाट्यक्षेत्रात चंद्रकांत कुलकर्णी यांचे योगदान मोठे; पोलिस आयुक्त विवेक फणसळकर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वैभवशाली मराठी नाट्यपरंपरेत अलीकडच्या काळात नाटकाला नव्या रूपात आणून ती मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माते चंद्रकांत कुलकर्णी यांचे खूप मोठे योगदान राहिलेले आहे. या क्षेत्रामधील सलग ४० वर्षे त्यांचे हे योगदान अत्यंत मोलाचे आहे, असे गौरवोद्‌गार मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले.

‘सकाळ समूहा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चंद्रकांत कुलकर्णी नाट्य महोत्सवा’च्या समारोपप्रसंगी चंद्रकांत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी फणसळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर नील पेठे, ‘पितांबरी’च्या मॅनेजर प्रियांका पावसकर, अभिनेते वैभव मांगले, निर्मिती सावंत, ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले, सकाळ माध्यम समूहाचे ‘मल्टिमीडिया’चे संपादक अंकित काणे आदी मान्यवर उपस्थित होते.

फणसाळकर पुढे म्हणाले, ‘चंद्रकांत कुलकर्णी अत्यंत नावाजलेले दिग्दर्शक आहेत. ‘वाडा चिरेबंदी’पासून ‘संज्याछाया’पर्यंत असंख्य नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. या प्रवासात वेगळ्या धाटणीची नाटके मराठी रंगभूमीवर आणली आहेत. त्यांच्या ४० वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीचा ‘सकाळ’ आणि रसिकांच्या वतीने सन्मानित करताना मला खूप आनंद झाला. त्यांनी अशाच उत्तम कलाकृती या पुढेही महाराष्ट्राला देत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नाटकाच्या जाहिरातीवर दिग्दर्शक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी हे नाव दिसताच प्रेक्षक ती नाटके डोळे झाकून पाहायला जातात. हा माझा अनुभव आहे, असे फणसळकर म्हणाले. महाराष्‍ट्रातील नाट्य क्षेत्र समृद्ध करण्यासाठी त्यांनी नाट्यदिग्दर्शनाचे कार्य अविरत सुरू ठेवावे, असे सांगतानाच कुलकर्णी यांच्या नाट्य क्षेत्रातील ४० वर्षांच्या कारकिर्दीची केंद्र सरकारनेदेखील नोंद घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नाटक पाहण्यामध्ये जो आनंद आहे, तो चित्रपट पाहण्यात मिळत नाही. नाटकामध्ये जे काही आहे ते समोरासमोर होते. त्याला कुठलाही रिटेक नसतो. कलाकारांची यामागे प्रचंड मेहनत आणि तयारी असते. या कलावंतांना आपण निश्चितपणे प्रोत्साहन दिले पाहिजे. तरुणांनी वेळ काढून नाटकाला आवर्जून जायला पाहिजे, असे आवाहन फणसळकर यांनी केले.

शेवटपर्यंत नाट्य क्षेत्राची सेवा : कुलकर्णी

‘सकाळ माध्यम समूहा’मार्फत चंद्रकांत कुलकर्णी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कुलकर्णी यांचे स्वागत केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना कुलकर्णी म्हणाले, ‘मी माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत नाट्य क्षेत्राची सेवा करीत राहीन. १४ मार्च १९८८ रोजी मुंबईत आलो.

त्यावेळी ‘सकाळ’मध्ये उपसंपादक या पदावर रुजू झालो होतो. त्यानंतर कला क्षेत्रात केलेल्या कामाचे आणि आता या महोत्सवाच्या निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. त्याचे समाधान मला आहे. त्या काळात मला कलाक्षेत्रात काम करण्यासाठी पत्रकारितेतील अनुभवाचा फायदा झाला. ‘सकाळ समूहा’ने तेव्हाही मला खूप सहकार्य केले.

‘सकाळ’चा माझा सतत संपर्क राहिलेला आहे. ‘सकाळ करंडक स्पर्धे’चा मी ब्रँड ॲम्बॅसिडर होतो. आता नव्याने सुरू होणाऱ्या राज्यभरातील स्पर्धेचाही मी ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. याशिवाय ‘मधुरंग’, ‘यिन’ आदी उपक्रमांशीही माझा संबंध आला आहे. ‘सकाळ’शी सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध असल्याचे सांगत चंद्रकांत कुलकर्णी यांनी आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाबद्दल आभार व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ९८व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

IND vs PAK T20WC : what a ball…! पाकिस्तान संघाला पहिल्याच षटकात धक्का, Renuka Singh ने उडवला त्रिफळा, Video

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - वोटिंग ट्रेंड्समध्ये निक्कीने सूरजला टाकलं मागे

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

Maharashtra Politics: मोदींचं मंदिर बांधलेला भक्त सावध झाला; भाजपला मात्र 'राम राम' ठोकला

SCROLL FOR NEXT