Ajit Pawar, Sharad Pawar and Devendra Fadnavis  
मुंबई

Bavankule on Jayant Patil: फडणवीस मुख्यमंत्री होऊच नयेत यासाठी पवारांनी शकुनी मामाचा खेळ केला? भाजप आक्रमक

पहाटेच्या शपथविधीबद्दल जयंत पाटलांच्या विधानानंतर भाजप आक्रमक झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल जयंत पाटलांच्या विधानानंतर भाजप आता आक्रमक झालं आहे. फडणवीस मुख्यमंत्री होऊच नयेत यासाठी पवारांनी राज्यात महाभारत घडवून आणत त्यात शकुनीमामाचं काम केलं का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच इतर अनेक सवालही यावेळी त्यांनी विचारले आहेत. (Chandrashekhar Bavankule on Jayant Patil Sharad Pawar play Shakuni Mama game)

बावनकुळे म्हणाले, जनतेच्या मनातील सरकार येऊ नये म्हणून कपट कारस्थान केलं. शरद पवारांनी जर हे कारस्थान केलं नसेल तर जयंत पाटील शरद पवारांना बदनाम का करत आहेत? जयंत पाटलांवर काही अन्याय झाला आहे का? जयंत पाटलांना विरोधीपक्ष नेता केलं नाही म्हणून त्यांचा काही राग आहे का? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत.

जयंत पवारांच्या विधानामुळं दोन शक्यता आहेत एकतर शरद पवार या कपटामध्ये सामील असतील, त्यांनी शकुनीमामाचा खेळ केला असेल अन्यथा जयंत पाटील खोटं बोलत असतील कारण त्यांच्या मनात राग असेल. पण जर ते खरे बोलले असतील तर शरद पवारांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे आणि सत्तेच्या लालसेपोटी तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊच द्यायचं नाही या भावनेतून हे कारस्थान केलं असेल?

हे ही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

शरद पवारांनी उत्तर द्यावं

फडणवीसांमधील अशा कुठल्या गोष्टीमुळं शरद पवारांना त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं. फडणवीसांमध्ये काय कमी होती? त्यांची कुठली गोष्ट आडवी आली? कोणत्या भावनेनं पवारांना त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं? फडणवीस मुख्यमंत्री होऊच नयेत यासाठी एवढं मोठ कारस्थान करावं लागलं, एवढं मोठं महाभारत राज्यात घडवावां लागलं, शकुनीमामा सारखा खेळ करावा लागला? याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं.

जनतेनं दिलेल्या मताचा खून करुन जर शरद पवारांनी ही खेळी केली असेल तर हे वाईट असून त्यांनी पुन्हा असं करु नये अशी माझी त्यांना विनंती आहे, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT