मुंबई

मुंबईतल्या कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या किती, जाणून घ्या

मिलिंद तांबे

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर केला आहे. सध्या सर्वजणच कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतानाही दिसतोय. या व्हायरसचा सर्वाधिक फटका हा मुंबई शहराला बसला. दरम्यान कोरोनासंबंधित मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई हे देशातील सर्वाधिक रुग्ण असलेले शहर ठरले असले तरी आज केवळ 22 हजार 647 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  त्यात 15 हजार 128 लक्षणे रहीत तर 6 हजार 322 लक्षणे असलेले रुग्ण आहेत. तर 1 हजार 197 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. 

मुंबईत 24 जुलैपर्यंत 4, लाख 70 हजार 330 चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 22.73 टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 06 हजार 891 इतकी आहे. त्यातील 78 हजार 260 बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. तर 5 हजार 981 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये 4 हजार 879 रुग्णांचे वय 50 वर्षांच्या वर होते.

मुंबईत 10 हजार 200 बेड रिक्त 

मुंबई पालिकेने कोरोना रुग्णांसाठी 21,884 बेडची तयारी केली आहे. त्यातील 11 हजार 684 बेड भरले आहे. त्यात 10 हजार 200 बेड रिक्त असल्याचा दावा केला जातोय. एकूण बेडपैकी 16 हजार 788  DCH-DCHC चे असून त्यातील 9 हजार 858 बेड भरले आहेत तर 6 हजार 930 बेड रिक्त आहेत. ते बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. 

कोविड केअर सेंटर 2 मध्ये 5,096 बेडची तयारी करण्यात आली आहे. त्यातील 1,826 बेड भरलेत तर 3,270 बेड रिक्त आहेत. तर आयसीयूमध्ये एकूण 1,764 बेड असून त्यातील 1557 बेड भरले असून 207 बेड रिक्त आहेत.

मुंबईत 4,962 ऑक्सिजन बेड रिक्त

रुग्णालयांतील ऑक्सिजन बेडची क्षमता ही 11 हजार 248 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यातील  6,322 बेड भरलेत. तर 4,962 बेड रिक्त आहेत. व्हेंटिलेटर बेडची क्षमता 1,080 इतकी असून त्यातील 965 बेड भरले असून 115 बेड रिकामे असल्याचा दावा केला जातोय.

आतापर्यंत 18,68,962 लोकांना ट्रेस करण्यात आले. त्यात 6,52,253 हाय रिस्क तर 12,16,709 लो रिस्क संपर्कातील आहेत. आतापर्यंत 16,60,473 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यात 1,01,842 होम क्वारंटाईन असून 6,647 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यत 6,74,053 ज्येष्ठ नागरिकांना तपासणी करण्यात आली आहे.

मुंबईत 328 कोविड केअर सेंटर 1 सुविधा केंद्र उभे करण्यात आले असून त्यात 50,077 बेड ची सुविधा करण्यात आली आहे. सध्या  6,801 रुग्ण दाखल असून आतापर्यंत 1,32,913 रुग्णांना सुविधा देण्यात आली आहे. तर 173 कोविड केअर सेंटर 2 सुविधा केंद्र उभे करण्यात आले असून त्यात 23,945  बेड कॅॅही सुविधा करण्यात आली आहे. त्यातील 60 केंद्र सध्या कार्यान्वित असून त्यात 5,096 बेड उपलब्ध आहेत.सध्या 1,826 बेड भरलेत. आतापर्यंंतत 29,207 रुग्णांनी सुविधा देण्यात आलीय.

मुंबईत एकूण 631 कंटेन्मेंट झोन असून 733 झोन शिथिल करण्यात आले. तर 6169 ऍक्टिव्ह इमारती सील करण्यात आले. तर आतापर्यंत 13,230  इमारती शिथिल करण्यात आल्यात. पालिकेच्या कॉल सेंटरवर आतापार्यंत 2,05,523 कॉल आल्याची माहिती देण्यात आलीय.

संपादनः पूजा विचारे 

Check out the number of Corona Active patients in Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT