मुंबई- कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. मात्र या काळात राज्यातली आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मद्यविक्रीची दुकानं सुरु केली. पण दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहिल्यावर पुन्हा एकदा अनावश्यक सेवा सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यानंतर महसूल मिळवण्यासाठी दारूची ऑनलाईन विक्री करावी अशी मागणी सुरु झाली. त्यानुसार आता मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता ऑनलाईन पद्धतीनं मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मद्यविक्री करता वाईनशॉप सुरु करण्याचा प्रयत्न फसला होता. सर्व उद्योगधंदे बंद असल्याने सर्वच महसूल मिळवायचा कसा, असा प्रश्न पडला. त्यानुसार राज्यात दारुची दुकानं सुरु करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यानं पुन्हा दारू विक्री बंद करावी लागली आहे.
ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी
दारू दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं ऑनलाईन दारूविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी सशर्त असून ज्या ठिकाणी दारूबंदी आहे आणि जिथे अद्याप दारूविक्रीला परवानगी नाही, अशा ठिकाणी ही ऑनलाईन दारू मिळणार नाही. 14 मेपासून म्हणजेच उद्यापासून सकाळी 10 वाजल्या पासून ही ऑनलाईन मद्यविक्री सुरु केली जाईल. ज्या जिल्हयात आधीपासून मद्यविक्री करण्यास परवानगी होती, त्याच जिल्हयात ही ऑनलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन मद्य विक्री करताना दुकानदारांना काही नियम आणि अटी शासनाने घालून दिल्या आहेत.
कशी कराल ऑनलाईन ऑर्डर
दारू घरपोच देण्यासाठी जी व्यक्ती जाईल, त्या व्यक्तिला मास्कचा वापर करणं अनिवार्य असेल. तसंच त्या व्यक्तीला वेळोवेळी हाताचे निर्जंतुकीकरण करावं लागणार आहे. या सगळ्याची दक्षता दुकानदाराने घ्यायची आहे.
ऑनलाईन मद्य विक्री करताना छापील किंमत म्हणजेच MRP दरानेच मद्य विकलं जावे अशा सक्त सुचना उत्पादन शुल्क विभागानं दिल्या आहेत. राज्यातील 33 पैकी 21 जिल्ह्यात ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. तर 12 जिल्हयात ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आलेली नाही.
ऑनलाईन मद्यविक्रीचे नियम आणि अटी
या जिल्ह्यात ऑनलाईन मद्यविक्री सुरू
ठाणे (फक्त ठाणे ग्रामीण भाग), पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, गोंदिया, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, भंडारा, यवतमाळ.
या जिल्ह्यात मद्यविक्रीस मनाई
मुंबई, मुंबई उपनगर, लातूर, उस्मानाबाद, नागपूर, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, सातारा
मुंबई शहर रेड झोनमध्ये असल्यानं मुंबईतल्या मद्यप्रेमींची प्रतीक्षा अजूनही कायम असेल.
check weather your district is eligible for online liquor sale and know process of buying liquor online
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.