मुंबई : जगातल्या इतर देशांप्रमाणेच आता भारतातही कोरोनानं थैमान घालायला सुरुवात केली आहे. राज्यातही कोरोनाग्रस्तांचा आकडा १००० च्या पुढे गेला आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुबई कोरोनाचं केंद्रस्थान बनत चालली आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
मुंबईमध्ये असणाऱ्या एकूण कोरोनाग्रस्तांपैकी वरळी भागात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आहेत. वरळीत तब्बल ७८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मुंबईच्या काही दाटीवाटीच्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत हे यावरून दिसून येतंय.
वरळी परिसरात मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिसेस आणि टोलेजंग इमारतींचा भाग आहे. तसंच या भागात झोपडपट्टया देखील आहेत. वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळी, बेस्ट वसाहत, पोलिस कॅम्प या गजबजलेल्या वस्त्याही या भागात आहेत. त्यामुळे या भागात तब्बल ७८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे हा पूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
वरळीनंतर मुंबईच्या इतरही गजबजलेल्या भागांमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. भायखळ्यात ४८ रुग्ण तर ग्रॅंट रोड आणि ताडदेव या भागांमध्ये ४३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत सर्वात कमी रुग्णांची नोंद मस्जिद बंदर आणि कुलाबा परिसरात झाली आहे. या भागांमध्ये आतापर्यंत ५ ते ६ रुग्ण आढळून आले आहेत.
दुसरीकडे धारावीमध्येही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्या १५ दिवसांपासून सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा, विमानसेवा आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहेत. तरीही रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. ही प्रशासनापुढची खरी चिंता आहे.
मुंबईत कुठे किती रुग्ण:
check in which parts of mumbai there are maximum corona positive cases full list
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.