mumbai esakal
मुंबई

मुंबईत शिवसेना आक्रमक; पोलिस, कार्यकर्त्यांमध्ये झटापट

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केली आहे.

मुंबई - मुंबईत शिवाजी पार्कवर आंदोलन सुरु असून शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेकडून निषेधार्थ आंदोलन केलं जात आहे. यावेळी शिवाजी पार्कवर शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. यावेळी पोलिसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काहीकाळा वातवरणात तणाव निर्माण झाला आहे.

कर्नाटकातील बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला. यानंतर राज्यातील अनेक ठिकणांहून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. राज्यातील (Maharashtra) नेत्यांनीही याविषयी प्रतिक्रिया दिल्यावे राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील (Mumbai) लालबाग परिसरात शिवसेनेने (Shivsena) आंदोलन केले आहे. कर्नाटक (Karnatak) मुख्यमंत्र्यांच्या (basavaraj bommai) विधानाचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन केले आहे. परिणामी लालबाग परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, आमदार अजय जाधव, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत सुरु आहे.

दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit pawar) जलसंपदा मंत्री जयंत पाटील, (Jayant patil) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व पक्षाच्या नेत्यांनी निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) राज्यभरातील शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनी घोषणा केली आहे.

याप्रमाणे गेट वे ऑफ इंडिया (Gate way of India) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आज दुपारी 4 वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. तरी यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते महाराजांना दुधाचा अभिषेक करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT