Uddhav Thackeray addressing a press conference regarding the Shivaji Maharaj statue incident. esakal
मुंबई

Rane VS Thackeray : मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, जोडेमारो आंदोलन करणार; उद्धव ठाकरे यांची आक्रमक भूमिका

Clash at Rajkot Fort, Thackeray-Rane Dispute Intensifies : ठाकरे-राणे वाद आता आणखी तीव्र होत चालला आहे. महायुती सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये तणाव वाढत आहे, आणि या वादामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नव्या संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.

Sandip Kapde

राजकोट किल्ल्यावर आज घडलेल्या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या मोर्चाला भाजपाचे निलेश राणे यांनी विरोध केला, ज्यामुळे परिस्थिती अत्यंत तणावग्रस्त झाली. दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाली. यामुळे ठाकरे आणि राणे यांच्या वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. निलेश राणे यांनी “आधी स्थानिक मग बाहेरच्या लोकांना किल्ल्यावर येऊ द्या,” असे म्हणत स्थानिकांच्या हक्कांची मागणी केली. ठाकरे समर्थकांनी मात्र, “तीन दिवस स्थानिक कुठं होते?” असा सवाल करत राणे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांची तातडीची पत्रकार परिषद

राजकोट येथील आंदोलनावर उद्धव ठाकरे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले मोदी-शाहांच्या गद्दारांनी रस्ता अडवला. ते शिवद्रोही आहेत. हे सरकारचं शिवद्रोही आहे.

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची घटना कधीही घडली नाही, याविरोधात सरकारला जोडेमारो आंदोलन करणार आहोत. माजी राज्यपाल कोश्यारी यांचं ऑफिस समुद्रकिनारी होतं, वाऱ्याने त्यांची कधी टोपी उडाली नाही, यांचे मंत्री म्हणतात हवेने पुतळा पडला, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.

महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. रविवारी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्यावळ आंदोलन करणार आहोत. पुतळ्याच्या कामात कोट्यावधींचा घोटाळा झाला. नौदलावर जबाबदारी टाकून सरकार मोकळं होण्याचा प्रयत्न करत आहे. अभुवन नसताना २४ ते २५ वर्षाच्या मुलाला काम दिलं. गुन्हा दाखल झाला म्हणजे गुन्हा घडला आहे. मग गुन्हेगार कोण? , असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

मत मिळवण्यासाठी, कोकण जिंकण्यासाठी घाईत नरेंद्र मोदी यांनी पुतळ्याचं उद्घाटन केलं, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. हे गुन्हा दडपून टाकत आहेत. कायदा सक्षम आहे पण यंत्रणेवर दबाव असल्याचे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मालवणात आमच्या लोकांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, तिथे रस्ता अडवला गेला. ही घटना कोकणवासीयांना चांगलीच कळाली आहे. मोदीजींच्या नौदल दिनाच्या आगमनानंतर या घटनेने सगळ्यांचा अभिमान वाढला. मात्र, घाईत उभारण्यात आलेल्या पुतळ्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला. पुतळा उभारणारा कोण आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणारा कोण, हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. या प्रकारातील भ्रष्टाचार किळसवाणा आहे आणि शिवद्रोही कोण आहेत हे जनतेसमोर उघड झाले आहे.

नौदल पोकळ आहे का ? समुद्रातील सामना ते करत असतात ना? त्यांना कल्पना नव्हती का? कोकण जिंकण्यासाठी हा कार्यक्रम घेतला. त्याला एवढ्या दिवसात काम करण्याचा दबाव होता ? समुद्र, वारे परिस्थिती याचा अभ्यास आणि अनुभव त्या व्यक्तीला नव्हता, असेही ठाकरे म्हणाले.

शरद पवार आणि नाना पटोले यांचा हल्लाबोल

या आंदोलनात शरद पवार यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला. "सरकारचं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काळजी घेण्याचे काम होते, पण त्यांनी ते केले नाही," असे पवार यांनी म्हटले.

याच वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारविरोधात बनवलेले रिल्स दाखवले. नाना पटोले म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर केवळ शिवप्रेमी असल्याचे दाखवण्यासाठी हा प्रयत्न होता, असे पटोले यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणतात की यापेक्षा मोठा पुतळा बनवू, पण तुम्हाला तो संभाळता येणार का?" पटोले यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि निषेध म्हणून मुंबईत १ तारखेला आणि राज्यात २ तारखेपासून जोडेमारो आंदोलन सुरू राहील असेही जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT