Shivaji Maharaj Wagh Nakh esakal
मुंबई

Shivaji Maharaj Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखं मुंबईत दाखल! कधी पाहता येणार?

Shivaji Maharaj Wagh Nakh News : वाघ नखे सातारा येथे ठेवली जातील अशी माहिती देण्यात आली आहे. या ऐतिहासिक शस्त्राला परत आणण्याचे महत्त्व पूर्ण महाराष्ट्राला आहे.

Sandip Kapde

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखं महाराष्ट्रात परत आणण्यात आले आहेत. पुरातत्व विभाग आणि कस्टम विभागाच्या सहकार्याने ही वाघनखं मुंबईत आणण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे महत्त्वाचे शस्त्र परत आणण्याचे काम झाले आहे.

सातारा येथे नेण्याची तयारी

मुंबईत दाखल झाल्यानंतर सातारा पोलीस आणि पुरातत्त्व विभागाकडून या वाघनखांची तपासणी करण्यात आली आणि नंतर ते सातारा येथे नेण्यात येतील. वाघ नखे सातारा येथे ठेवली जातील अशी माहिती देण्यात आली आहे. या ऐतिहासिक शस्त्राला परत आणण्याचे महत्त्व पूर्ण महाराष्ट्राला आहे.

कधी पाहता येणार?

शिवरायांची वाघनखं उद्या म्हणजे गुरुवारी (18 जुलै) महाराष्ट्रात येणार असून 19 जुलैला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या वाघनखांचा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्या संध्याकाळी वाघनखं सातारा येथील संग्रहालयात पोचतील, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहतील, मंत्रिमंडळातील कोणी उपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता सातारा येथे वाघनखं आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येईल. या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. याच कार्यक्रमात प्रतापगड विकास प्राधिकरणाची घोषणा केली जाईल.

वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा आरोप-

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी एक महत्त्वाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये उघड केली होती. त्यांच्या मते, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून आणण्यात आलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. त्यांनी सांगितले की, म्युझियमकडून केलेल्या पत्रव्यवहारात ही वाघनखे 1971 मध्ये लंडनमध्ये ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

सावंत यांनी सरकारला जनतेची दिशाभूल न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, ही वाघनखे अस्सल नसल्यामुळे यावर करोडो रुपये खर्च करणे योग्य नाही. तसेच, त्यांनी हेही स्पष्ट केले की, लंडन संग्रहालयाने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचा दावा कधीही केलेला नाही.

ऐतिहासिक सत्य आणि सरकारची भूमिका

इंद्रजित सावंत यांच्या मते, अस्सल वाघनखे सातारा येथेच आहेत. त्यांनी सांगितले की, लंडनमध्ये फक्त सहा वाघनखे आहेत, त्यापैकी एक आणून फसवणूक केली जात आहे. सावंत यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की, त्यांनी या प्रकरणात ताबडतोड स्पष्टीकरण द्यावे आणि जनतेची दिशाभूल होऊ नये याची काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT