मुंबई

कर्तव्य न बजावणारे मुख्यमंत्री व अनिल परब यांनी राजिनामा द्यावा; भाजप आमदाराचा घणाघात

दीपक घरत

पनवेल - एसटी महामंडळाकडून वेळीच पगार न मिळाल्याने एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ पनवेल भाजपा तर्फे पनवेल एसटी आगार येथे मंगळवारी (ता.10) राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शना प्रसंगी बोलताना आमदार ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका करत सध्याचे सरकार हे जनतेच्या भावनांची कदर नसलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सपशेल अपयशी ठरलेले सरकार असल्याची टीका करत महाविकास आघाडीने सतत जनतेची फसवणूक आणि निष्क्रिय कारभार केला आहे, त्यामुळे स्वतःला राज्याचे कुंटुंब प्रमुख म्हणवून घेणाऱ्या मात्र तसे कर्तव्य न बजावणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी केली.

एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगार मात्र तो ही थकल्यामुळे कंटाळून जळगाव येथील 'एस.टी. कर्मचारी मनोज चौधरी’ व रत्नागिरी येथील ‘पांडुरंग गदडे’ यांनी आत्महत्या केली. या दुर्दैवी आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला असून त्या विरोधात पनवेल एस्.टी. स्थानकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आंदोलनाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.या आंदोलनास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chief Minister and Anil Parab who did not perform their duties should resign said BJP MLAs 

-------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT