Bhiwandi Building Collapsed Esakal
मुंबई

Bhiwandi Building Collapsed: CM शिंदेंची दुर्घटनाग्रस्त इमारतीला भेट, धोकादायक इमारतींबाबत प्रशासनाला दिले निर्देश

जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

Building collapsed in Bhiwandi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भिवंडी येथील वळपाडा दुर्घटनाग्रस्त इमारतीला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकाच्या कामाची पाहणी करत इतर माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या आहेत.(Building collapsed in Bhiwandi)

त्याचबरोबर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाकडून केला जाईल असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

भिवंडीत अनधिकृत व धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न वारंवार समोर येत असतो. त्यातच इमारत दुर्घटना घडल्याच्या देखील अनेक घटना भिवंडीत घडल्या असून या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

भिवंडीतील अतिधोकादायक इमारतींचा लवकरात लवकर सर्वे करून अतिधोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह भिवंडी मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना यावेळी दिले आहेत.

भिवंडीतील क्लस्टर योजना राबविण्यासाठी या योजनेसाठी बाधक असलेल्या जाचक अटीनियमानमध्ये बदल करून, लवकरात लवकर भिवंडीत क्लस्टर योजना राबविण्यात येईल. माणसांच्या जिवापेक्षा दुसरे काही महत्वाचे नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हंटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी इमारत दुर्घटना स्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

भिवंडी तालुक्यात वळपाडा ग्रामपंचायत हद्दीत काल (शनिवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथे ही वर्धमान इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २२ रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT