मुंबई: पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करत आहेत. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध आणखी कडक करणे किंवा लॉकडाउन संबंधी मुख्यमंत्री काही घोषणा करु शकतात. लॉकडाउन नकोच असाच राज्यातील जनतेचा सूर आहे. कारण त्यामध्ये आर्थिक नुकसान भरपूर होते. पण मुख्यमंत्री आज काय निर्णय घेतात, त्याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
- घाबरुन जाऊ नका, मला अनेकांचे फोन आले.
- मी घाबरवण्यासाठी आलेलो नाही
- मार्ग काढण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधतोय.
- वर्षभरापासून आपण एका विचित्र विषाणू बरोबर लढतोय
- मागच्यावर्षी मार्चच्या महिन्यात कोविड विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला.
- कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालो होतो, कारण आपण एकत्र लढलो होतो.
- गेल्यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, आताही तोच काळ आला.
- मधल्याकाळात आपण शिथील झालो.
- लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रमांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला.
- विषाणू वेगवेगळे अवतार धारण करुन संकटात टाकतोय, परिक्षा बघतोय.
- कस्तुरबा आणि पुण्यात NIV मध्ये कोरोनाच्या चाचण्या व्हायच्या.
- आज कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या ५०० लॅबस उभ्या केल्यात.
- मुंबईत दरदिवशी ५० हजार चाचण्या करतोय.
- महाराष्ट्राची क्षमता ७५ हजार चाचण्या करण्याची होती, आता १ लाख ८२ आहे. लवकरच २.५० लाखापर्यंत क्षमता करण्याचा प्रयत्न
- अँटीजेन नाही, आरटी-पीसीआरने ७० टक्के चाचण्या करण्याचं लक्ष्य.
- महाराष्ट्रातील परिस्थिती धक्कादायक वाटत असली, तरी सत्य लोकांसमोर ठेवतोय.
- मला खलनायक ठरवलं तरी मी माझी जबाबदारी पार पडणार. दुसऱ्या राज्यांबद्दल बोलणार नाही.
- कोविड येण्यााधी महाराष्ट्रात कोविडसाठी बेडची संख्या १० हजारही नव्हती. मागच्या मार्चमध्ये बेड, रुग्णालये मिळत नव्हती.
- लष्कराच्या धर्तीवर फिल्ड हॉस्पिटल उभारणार महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य आहे,
- आठ-दहा हजारवरुन बेडची संख्या पावणेचार लाखापर्यंत नेली.
- कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर सुविधा अपुऱ्या पडतील. सुविधा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. साधने वाढली तरी मनुष्यबळ कुठून आणणार असा प्रश्न आहे. याचीच चिंता मोठी आहे. डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बरं झाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता थोडी कमी होते. त्यांना थकवा आलेला असतो आणि आरामाची गरज असते.
- कोविड येण्यााधी महाराष्ट्रात कोविडसाठी बेडची संख्या १० हजारही नव्हती. मागच्या मार्चमध्ये बेड, रुग्णालये मिळत नव्हती.
- लष्कराच्या धर्तीवर फिल्ड हॉस्पिटल उभारणार महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य आहे,
- आठ-दहा हजारवरुन बेडची संख्या पावणेचार लाखापर्यंत नेली.
- आयसोलेशन बेडसची संख्या २ लाख २० हजार आहे. त्यात ६२ टक्के बेडस भरले गेले आहेत.
- ऑक्सिजनचे बेडस ६२ हजारच्या आसपास आहेत, ते २५ टक्के भरले आहेत.
- मला खलनायक ठरवलं तरी मी माझी जबाबदारी पार पडणार. दुसऱ्या राज्यांबद्दल बोलणार नाही.
- लस घेतली तरी कोविड होईल. पण तो घातक नसेल.
- आता पाऊस नाही, वादळ आहे, लस घ्या ती सध्या एक छत्री आहे.
- लस घेणं, चाचण्या वाढवण हा उपाय मला वाटत नाही.
- रुग्ण वाढ रोखण्यासाठी कोणी उपाय सुचवत नाही.
- संपूर्ण देशात आपलं राज्य हे लस देणारं नंबर एकचं राज्य आहे
- लसीचा पुरवठा जास्त होईल तेव्हा ही क्षमता आपण दुप्पटीने लस देऊ शकतो.
- ब्राझीलमध्ये मृत्यूदर वाढलाय आणि बेरोजगारी वाढलीय
- रशियात लस आलीय
- फ्रान्समध्ये परिस्थिती नाजूक आहे. तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु
- हंगेरी, डेन्मार्क मध्येही अशीच परिस्थिती
- सर्वपक्षीयांना सहकार्य करण्याचं आवाहन
- लॉकडाउन घातक पण आपण कात्रीत सापडलोय.
- महाराष्ट्रात कोरोनाचं नाटक सुरु झालंय, जनता लॉकडाऊनला कंटाळली आहे, लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही, आधी रोजगाराचे पैसे द्या, पाच हजार रुपये जमा करा, असा विरोधकांचा सूर आहे.
- नाव न घेता विरोधी पक्षांवर टीका
- आरोग्य सुविधा वाढवतो पण रोज मला ५० डॉक्टर्स उपलब्ध करुन द्या.
- मला त्या विषयातला तज्ज्ञ द्या, ही तज्ज्ञ डॉक्टर्स कुठून आणायची.
- विविध राजकीय पक्ष, तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करतोय
- लॉकडाऊन हा उपाय नाही, पण संसर्ग रोखायचा कसा, लसीकरणाने कोरोना थांबत नाहीय, लस घेतलेल्यांना त्रास कमी पण तो होऊ शकतो.
- दुसरे काय उपाय असतील तर सांगा.
- पुढच्या १५-२० दिवसात हॉस्पिटल्स तुडूंब भरतील. ऑक्सिजनही कमी पडू शकतो.
- स्वयंशिस्तीने कोरोनाची दुसरी लाट रोखू शकतो,
- कोरोनाला मी मात करुन देणार नाही, आपल्यालाच कोरोनावर मात करायची आहे.
- जनतेच्या जीवाशी खेळू नका, विरोधीपक्षांना आवाहन.
- लोकांचे जीव वाचवायचे आहेत.
- लॉकडाउनचा इशारा देतोय, लॉकडाउन आज जाहीर करत नाहीय.
- डॉक्टरांना मदत करायला रस्त्यावर उतरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.