Uddhav thackeray Twitter
मुंबई

१२ कोटी डोस एकरकमी चेकने विकत घेण्याची तयारी आहे- उद्धव ठाकरे

लसीकरणाबद्दल दिली महत्त्वाची माहिती

दीनानाथ परब

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधला. कालच लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे भविष्यातील राज्याची दिशा कशी असेल?, लसीकरण आणि अर्थव्यवस्थेला चालना कशी देणार? त्या दृष्टीने मुख्यमंत्री बोलतील अशी अपेक्षा होती. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला होणार उद्धव ठाकरे यांचे संबोधन महत्त्वाचे होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील मुद्दे

मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना नम्र अभिवादन करतो.

कामगार दिनाच्या कामगार बांधव-भगिनीना शुभेच्छा देतो

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगार उतरले होते, त्यांनी तो लढा दिला नसता मुंबई महाराष्ट्राला मिळाली नसती.

शेतकरी आणि कामगारांनी मोलाचं योगदान दिलं. त्या सर्वांना मानाचा मुजरा

जी काही बंधन लावली आहेत, त्यापेक्षा अधिक कडक लॉकडाउन लावण्याची आवश्यकता आहे का? अशी कोर्टाने काल विचारणा केली.

यापेक्षाही कडक लॉकडाउन करण्याची आवश्यकता वाटत असली तरी तशी वेळ येणार नाही असं मला वाटतं.

रुग्णसंख्या ओसरली नाही, पण रुग्णवाढ स्थिर राहिली.

९.५०-१० लाख सक्रिय रुग्ण संख्या दिसली असतील ती ६ लाखापर्यंत थोपवली.

लॉकडाउन नसता तर साडेनऊ-दहा लाख रुग्ण संख्या दिसली असती.

गेल्यावर्षी कोरोना चाचण्या करणाऱ्या दोन प्रयोगशाळा होत्या. आता ६०९ प्रयोगशाळा आहेत.

राज्याचं हित साधलं जाणार असेल तर इतरांचं अनुकरण करु.

व्हेंटिलेटर्स केंद्राने दिले होते. गेल्यावर्षी ३७४४ व्हेंटिलेटर्स होते. आता ११ हजारपेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स आहेत.

एसीमध्ये बसलो तरी परिस्थिती ऐकून घाम फुटतो.

राज्याची रोजची १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे. आता १७०० मेट्रीक टन लागतोय.

दररोज ५० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज.

राज्यात ऑक्सिजन काटकसरीने वापरतोय.

जिल्हा स्तरावर ऑक्सिजन प्लान्ट सुरु करण्याचे काम सुरु आहे.

कोविडची तिसरी लाट आली तरी ऑक्सिजन कमी पडू देणार नाही. ती वेळ येऊ नये, अशी माझी प्रार्थना आहे.

लिक्विड ऑक्सिजनची ने-आण करता येऊ शकतो. पण गॅस ऑक्सिजनची ने-आण करता येत नाही.

ऑक्सिजन प्लान्टच्या शेजारीच कोविड सेंटर्स सुरु करणार.

गेलं वर्ष ताण-तणावात गेलं. तो ताण कमी होण्याऐवजी वाढतोय. एसी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स सतत सुरु आहेत. त्यामुळे दुर्घटना घडतायत.

रोजी मंदावेल पण रोटी थांबणार नाही. ५,५०० कोटी एवढया रकमेचं पॅकेज जाहीर केलं. सुरुवातीला शिवभोजन थाळी १० रुपयात सुरु केली. आता ती थाळी मोफत देतोय. १५ लाखाहून अधिक नागरीकांना शिवभोजन थाळीचा लाभ देऊ शकलो. ३ कोटी ९४ लाख नागरीकांना शिवभोजन थाळीचा लाभ झालाय. ८९० शिवभोजन केंद्र सुरु झाली.

संपूर्ण जगात लाटांमागून लाटा येत आहेत. आपण किती कसोशीने प्रयत्न करु शकतो. ब्रिटनने दुसरी लाट अनुभवली. तिसरी लाट येणार नाही असं कोणी म्हणू शकत नाहीत. तिसऱ्या लाटेची आपण तयारी केली. तिसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम होऊ देणार नाही हा निश्चय केला आहे.

तिसरी लाट आल्यानंतर निर्बंध लावण्याची गरज वाटली तरी अर्थचक्र थांबता कामा नये. तिसरी लाट थोपवल्याशिवाय राहणार नाही.

लॉकडाउन सारखे निर्बंध लावले नसते, तर देशातलं चित्र बघितल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली असती ते लक्षात येतं.

१ कोटी ५८ लाख नागरीकांचे लसीकरण पूर्ण केलय. लसीकरण, कोरोना चाचणी आणि आरोग्य सुविधांमध्ये आपण देशात एकनंबरच राज्य आहोत. पण दुर्देवाने रुग्णवाढीमध्येही पुढे आहोत.

१८ ते ४४ वयोगटात सहा कोटी नागरीक आपल्या राज्यात येत आहेत. दोन डोसची मात्रा लक्षात घेता १२ कोटी डोस लागतील.

आर्थिक चणचण असली तरी जीव महत्त्वाचा आहे. १२ कोटी डोस एकरकमी चेकने विकत घेण्याची तयारी ठेवली आहे.

देशात दोनच लस उत्पादक आहेत. स्पुटनिक येणार आहे, त्यांच्याशी सुद्धा बोलत आहोत.

१८ ते ४४ वयोगटासाठी मे महिन्यात १८ लाख डोस मिळणार आहेत.

प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करा व मुख्य अॅपशी जोडा किंवा प्रत्येक राज्याला स्वतंत्र अॅप तयार करण्याची परवानगी द्या.

उद्यापासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु होणार.

जून-जुलैपासून लस उत्पादनची क्षमता वाढेल अशी माहिती आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी करणं हितवाह नाही.

उद्यापासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु होणार. उद्या पहिली लस देणार, शेवटची नाही. लसीकरणाची जबाबदारी पेलायला सरकार समर्थ आहे.

लसीकरणासाठी कुठेही गर्दी करु नका. ही लसीकरण केंद्र कोविड प्रसारक मंडळ होता कामा नये.

१८ ते ४४ वयोगटासाठी तीन लाख लसी आल्या आहेत. काल एकाच दिवशी पाच लाख लसींचे डोस दिले. १० लाख लसीकरणाची क्षमता आहे. सरकार सर्वांच लसीकरण करणार.

येत्या महिन्यात लग्नसमारंभ भरपूर आहेत. नाईलाज म्हणून २५ जणांची मर्यादा टाकली आहे. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घ्या. लग्नसमांरभ शिस्तीने पार पाडा.

तुमचे आशिर्वाद सरकारवर ठेवा. तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे. ते सर्व हे सरकार करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT