Diwali Purchasing sakal
मुंबई

Diwali Purchasing : चिनी उत्पादनांना फटका! स्थानिक उत्पादनांची विक्रमी खरेदी

दिवाळीच्या कालावधीत देशात ३.७५ लाख कोटी रुपयांचा विक्रमी व्यवसाय झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - दिवाळीच्या कालावधीत देशात ३.७५ लाख कोटी रुपयांचा विक्रमी व्यवसाय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्थानिक उत्पादनांच्या खरेदीच्या आवाहनाला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांच्या व्यवसायात चांगली वाढ झाली आहे, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) म्हटले आहे.

यंदाच्या दिवाळीत देशभरातील बाजारपेठांमध्ये ३.७५ लाख कोटी रुपयांहून अधिक विक्रमी व्यापार झाला. या सर्व सणांना ग्राहकांकडून भारतीय वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. अद्याप, गोवर्धन पूजा, भाऊबीज, छट पूजा आणि तुळशीविवाह सण अजून बाकी आहेत. त्यामुळे आणखी ५० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.

या आधी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चीनी वस्तूंची खरेदी होत असे. बाजारपेठेत जवळपास ७० टक्के वस्तू चीनमध्ये तयार झालेल्या असत. यंदा मात्र देशातील कोणत्याही व्यावसायिकाने चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणतीही वस्तू आयात केली नाही. चिनी मालाला फटका बसला आहे. त्यामुळे चीनचे एक लाख कोटी रुपयांहून अधिक व्यापाराचे नुकसान झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्थानिक आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा हा परिणाम असून, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनेही या दिवाळीत देशभरात ‘भारतीय उत्पाद-सबका उस्ताद’ मोहीम राबविली. या मोहिमेलाही देशभरातील ग्राहकांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे चिनी मालाची मागणी घटली, परिणामी चीनचे एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने म्हटले आहे.

अन्नधान्य, किराणाची सर्वाधिक खरेदी

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या अहवालानुसार, सणासुदीच्या काळात झालेल्या ३.७५ लाख कोटी रुपयांच्या व्यवसायात सुमारे १३ टक्के मागणी अन्नधान्य आणि किराणामालाला होती. तर दागिने खरेदी नऊ टक्के झाली.

कापड आणि वस्त्रप्रावरणे व्यवसायात १२ टक्के उलाढाल झाली, तर सुका मेवा, मिठाई आदींची उलाढाल चार टक्के आहे. उर्वरित २० टक्के खर्च वाहन, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, खेळण्यांसह इतर वस्तू आणि सेवांवर झाला. या दिवाळीत देशभरातील पॅकिंग व्यवसायालाही मोठी बाजारपेठ मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीमध्ये स्थानिक पातळीवरील वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्याचा मोठा परिणाम संपूर्ण देशात दिसून येत आहे. नागरिक स्थानिक उत्पादक, कारागीर आणि कलाकार यांनी बनविलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. संघटनेने देशभरात ‘भारतीय उत्पाद-सबका उस्ताद’ मोहीम राबविली. या मोहिमेलाही देशभरातील ग्राहकांचा मोठा पाठिंबा मिळाला.

- प्रवीण खंडेलवाल, राष्ट्रीय सरचिटणीस, सीएआयटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT