राष्ट्रवादी सोडून 2019मध्ये चित्रा वाघ यांनी केला होता भाजपमध्ये प्रवेश
मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, वन विभागाच्या अधिकारी दिपाली चव्हाण यांचे आत्महत्या प्रकरण अशा महिलांसंबधीच्या विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पक्ष नेतृत्वाकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चित्रा वाघ यांनी स्वत: ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली. पूजा चव्हाण प्रकरणात तर चित्रा वाघ यांच्या आक्रमकतेमुळे राज्याचे तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना राजीनामादेखील द्यावा लागला. भाजप प्रदेशच्या उपाध्यक्षा असलेल्या चित्रा वाघ यांची भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे नियुक्ती पत्र चित्रा वाघ यांना दिले. (Chitra Wagh Appointed as in-charge of BJP Maharashtra Youth Female Wing Chandrakant Patil Tweets Photo)
'युवती आणि महिला या विषयातील प्रदीर्घ अनुभवाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची भाजपा महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चित्राताई, मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा!', असं ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले. तर 'पक्षाने व आपण दाखवलेल्या विश्वासाला मी नक्कीचं सार्थ ठरवेन. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते', असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केले.
चित्रा वाघ या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. त्यावेळी त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर प्रचंड हल्लाबोल केला होता. त्यानंतर, 2019 मध्ये जुलै महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांतच त्यांना भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले. '20 वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्या पक्षात असेपर्यंत मी त्या पक्षाचे काम करतच राहिले. शरद पवार यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही माझ्यावर मनापासून प्रेम केलं. असंच प्रामाणिकपणे मी भाजपसाठीही काम करेन', असा विचार चित्रा वाघ यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी मांडला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.