मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai airport) अदानी ग्रुपने (adani group) आपल्या ब्रॅण्डिंगचे बोर्ड (brand board) बदलण्याचे काम सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (international airport) नाव बदलून अदानी ग्रुपने अदानी विमानतळ अशा नावाचे फलक विमानतळ परिसरात लावल्याने संतप्त शिवसैनिकांनी (shivsena) सोमवारी राडा केला होता. दरम्यान बोर्डाची तोडफोड (breks board) करत विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज नावानेच ओळखले जावे, एखाद्या उद्योगपतीच्या नावाने ओळखले जाणार असेल तर मान्य नाही अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती. (chtrapati shivaji maharaj-international airport-Mumbai airport-adani group board-nss91)
त्यानंतर आता अदानी ग्रुपने विमानतळावरील अदानी विमानतळ लिहिलेले बोर्ड काढणे सुरू केले असून, आता फक्त अदानी ग्रुपचा लोगो आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाचे बोर्ड लावण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या टिकेनंतर अदानी ग्रुपने हे बदल करण्याचे काम सुरू केले आहे. 2 ऑगष्ट रोजी शिवसेनेने अदानी ग्रुपच्या व्यवस्थावकांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या.
त्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या नामफलकाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे संबोधले जात असून, यापुढेही ही ओळख कायम रहावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.