Navi Mumbai CIDCO HOUSES: स्वतःचं घर असावं हे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सिडकोने तब्बल 26000 घरांची गृहनिर्माण योजना अमलात आणली आहे. याबाबतची घोषणा दसऱ्याला होईल असे वृत्त 'सकाळ'ने आधीच प्रकाशित केले होते. त्यानुसारच आज सिडकोने याची अधिकृत घोषणा केली आहे
तळोजा, खारघर, खारकोपर, कळंबोली, पनवेल, मानसरोवर, खांदेश्वर आणि वाशी या ठिकाणी हे घर उपलब्ध करण्यात आली आहेत.(Taloja, Kharghar, Kharkopar, Kalamboli, Panvel, Mansarovar, Khandeshwar and Vashi CIDCO Home)
या योजनेचे एकूण तीन टप्पे असून पहिल्या टप्प्यात अर्ज नोंदणी आणि कागदपत्र सादर करणे, दुसऱ्या टप्प्यात रकमेचा भरणा करणे असे असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.मिळालेल्या माहीती नुसार याची माहीती वेबसाईटवर सर्वसामान्यांसाठी जारी करण्यात आली आहे. मात्र संबंधित वेबसाईट ओपनच होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
याचबरोबर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आहे. कोणीही उत्तर देत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशावेळी शंका असल्यास संपर्क करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल होताना पाहायला मिळत आहे.
या सोडतीत दुर्बल घटकांसाठी १३ हजार, अल्प उत्पन्न गटासाठी १३ हजार घरे आहेत. यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास पन्नास टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर, तसेच खारकोपर, बामणडोंगरी गृहप्रकल्पातील शिल्लक घरांचा या गृहनिर्माण सोडतीत समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.